Rohit Sharma : 'गिलला हटवा आणि रोहितच्या हातात पुन्हा कॅप्टन्सी द्या', दिग्गज खेळाडूची मागणी, BCCI काय निर्णय घेणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने शुभमन गिलला हटवा आणि रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सीवर घ्या,अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या दिग्गजाने नुसती ही मागणी केली नाही आहे, तर दोघांच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या विजयाती आकडेवारी देखील मांडली आहे.
Remove shubman Gill odi Captain : टीम इंडिया आगामी टी20 वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करून आहे आणि त्यानंतर टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. पण या वर्ल्डकपसाठी आतापासून भारताने तयारी सूरू केली आहे. ही तयारी सूरू असताना भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने शुभमन गिलला हटवा आणि रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सीवर घ्या,अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या दिग्गजाने नुसती ही मागणी केली नाही आहे, तर दोघांच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या विजयाती आकडेवारी देखील मांडली आहे.त्यामुळे हा दिग्गज खेळाडू कोण आहे? व त्याने शुभमन गिलला हटवण्याची मागणी का केली आहे? हे जाणून घेऊयात.
शुभमन गिलला वनडे कॅप्टन्सीवरून काढून टाका आणि रोहित शर्माची पुन्हा नियुक्ती करा अशी मागणी टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी केली आहे. मागच्या ऑक्टोबर 2025 मध्ये शुभमन गिलने रोहित शर्माची वनडे कॅप्टन्सी घेतली होती. पण गिलच्या कॅप्टन्सीच्या नेतृत्वात भारताने दोनही मालिका गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेत त्याने कॅप्टन्सीमधून डेब्यू केला होता. या मालिकते भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गिलच्या मानेला दुखापत झाल्यामुळे तो साऊथ आफ्रिकेविरूद्ध मालिकेला मुकला होता.पण केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने साऊथ आफ्रिका विरूद्धची मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरूद्धची मालिका देखील भारताने 2-1 ने गमावली होती. त्यामुळे गिलच्या नेतृत्वावर प्रचंड टीका होत आहे. या टीके दरम्यान ईनसाईड स्पोर्टशी बोलताना मनोज तिवारी यांनी बीसीसीआयने मागच्या चुका सुधारून आता पुन्हा 2027 वनडे वर्ल्डकपची तयारी सूरू करावी,असा सल्ला दिला आहे.
advertisement
आता वेळ आहे तर चुक सुधारता येईल,म्हणूनच मी हा सल्ला देत आहे. आणि ही वर्ल्ड कपची गोष्ट आहे कोणती द्विपक्षीय मालिका नाही आहे,असे देखील मनोज तिवारीने सांगितले. आणि जर रोहित न्यूझीलंड विरूद्ध मालिकेत कॅप्टन असता तर कदाचीत मालिकेचा निकाल वेगळा लागला असता. पण भारताने दोन सामने सलग गमावले आणि न्यूझीलंडने पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर भारतात वनडे मालिका जिंकली.त्यामुळे रोहित गिल पेक्षा चांगला आहे. त्यामुळे जर रोहित कॅप्टन झाला तर टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याच्या संधी अधिक आहेत,असे मनोज तिवारीला वाटते.
advertisement
रोहितला काढायची गरज काय होती?
रोहित जर आज भारताचा कॅप्टन असता तर न्यूझीलंड विरूद्ध मालिकेचा निकाल निश्चित वेगळा लागला असता. कारण ज्यावेळेस त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळेस संघ एका योग्य मार्गावर चालत होता. आणि रोहित गिलच्या तुलनेत नुसता चांगला नाही तर खूपच चांगला कर्णधार आहे. आणि दोघांच्या नेतृत्वातील भारताच्या विजयाची आकडेवारी पाहता, रोहितलाच जास्त मिळतील कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताच्या विजयाची टक्केवारी 85-90 च्या आसपास असल्याचे शेवटी मनोज तिवारी सांगतो. आता दिग्गजाच्या या मागणीवर आता बीसीसीआय काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'गिलला हटवा आणि रोहितच्या हातात पुन्हा कॅप्टन्सी द्या', दिग्गज खेळाडूची मागणी, BCCI काय निर्णय घेणार?









