advertisement

'फक्त पैसे मागणारे आम्ही नाही' ट्रान्सजेंडर मनस्वीने तो डाग पुसला, काम पाहून तुम्ही कराल कौतुक

Last Updated:

पुण्यातील ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या मनस्वी गोईलकर यांनी एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून ट्रान्सजेंडर समुदायाबाबत समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

+
ट्रान्सजेंडर

ट्रान्सजेंडर मनस्वी यांचा 100 दिवसांचा समाजोपयोगी उपक्रम

पुणे: ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी हा शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यासमोर रस्त्यावर पैसे मागणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. ट्रान्सजेंडर व्यक्ती कायमच पैशांची किंवा वस्तूंची मागणी करत असतात, असा चुकीचा समज समाजात खोलवर रुजला आहे. मात्र हा गैरसमज मोडीत काढण्यासाठी पुण्यातील ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या मनस्वी गोईलकर यांनी एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून ट्रान्सजेंडर समुदायाबाबत समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाविषयी त्यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.
मनस्वी गोईलकर यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून LGBTQ समुदायासाठी काम करत आहेत. हा समुदाय स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, समाजातील अडचणींना तोंड देत अनेकजण नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. तसेच त्यांच्या समुदायातील अनेक सदस्य समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ट्रान्सजेंडर समुदायाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अद्याप पूर्णपणे बदललेला नाही. हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी मनस्वी गोईलकर यांनी समाजातील वंचित घटकांसाठी 100 दिवस मदत करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संकल्प त्या पूर्ण करत आहेत. या संकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत समाजातील अनेक वंचित घटकांना मदत केली आहे.
advertisement
नेमका काय आहे संकल्प?
मनस्वी गोईलकर या सलग 100 दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शाळकरी मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य देणे, रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करणे, तसेच गरजू आणि गोरगरीब कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून त्या समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ट्रान्सजेंडर समाजाविषयी असणारा चुकीचा गैरसमज दूर करण्याचा देखील प्रयत्न मनस्वी करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'फक्त पैसे मागणारे आम्ही नाही' ट्रान्सजेंडर मनस्वीने तो डाग पुसला, काम पाहून तुम्ही कराल कौतुक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement