बीडमधील GST अधिकारी मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, 7 दिवस उलटले; नोटही सापडली, पण...
- Published by:Sachin S
Last Updated:
सुसाईड नोटचा पुरावा असताना देखील गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल नातेवाईकांनी केला असून या सर्व प्रकाराला जबाबदार...
बीड : गुन्हेगारांच्या घटनेमुळे बजबजपुरी झालेल्या बीडमध्ये काही दिवसांपूर्वी एक जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा मृतदेह कारमध्ये आढळला होता. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. पण, पण आत्महत्येलाा सात दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल नाही. आत्महत्येआधी अधिकाऱ्याने सुसाईड नोटमध्ये काही अधिकाऱ्यांची नावं लिहिली होती. पण, तरीही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बीडच्या जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर या अधिकाऱ्याने दिनांक 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी १२ तास सचिन जाधवर हे बेपत्ता होते. महामार्गालगत कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळून आला होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. गंभीर बाब म्हणजे, या अधिकाऱ्याने सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे. त्यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आहेत. परंतु, अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने आता नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे.
advertisement
सुसाईड नोटचा पुरावा असताना देखील गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल नातेवाईकांनी केला असून या सर्व प्रकाराला जबाबदार असलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे आणि त्याच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, याच अधिकाऱ्याच्या मुलांचे अपहरण करण्याचा देखील प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्याचा देखील तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
advertisement
सुसाईड नोटमध्ये कुणाची नाव?
बीड इथं राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन जाधववर हे १६ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन जाधवर यांची कार सोलापूर - धुळे महामार्गालगत आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सचिन जाधव यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला होता.यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली होती. पण, नोट आढळून सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या नोटमध्ये कुणाची नावं आहे, याचीही माहिती पोलिसांनी अद्याप दिली नाही.
Location :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 5:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमधील GST अधिकारी मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, 7 दिवस उलटले; नोटही सापडली, पण...










