Mumbai : 'झिंज्या उपटल्या, बेडवर फेकलं', मसाजवालीने ग्राहकाला चोपलं, मुंबईतला शॉकिंग Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑनलाईन बुक केलेला मसाज रद्द केल्यामुळे मसाज करणाऱ्या महिलेने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे.
मुंबई : ऑनलाईन बुक केलेला मसाज रद्द केल्यामुळे मसाज करणाऱ्या महिलेने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. मुंबईच्या वडाळा पूर्व भागात ही घटना घडली आहे. अर्बन कंपनीची मसाज सर्व्हिस आपण बुक केली होती, पण ही सर्व्हिस आपण रद्द केली, त्यामुळे महिलेने आपल्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ केल्याचा दावा 46 वर्षांच्या महिलेने केला आहे. याबाबत महिलेने वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यामुळे ग्राहक आणि मसाज करणाऱ्या महिलेमध्ये कडाक्याचं भांडण आणि मारहाण झाल्याचं दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, मालिश करणारी महिला घराच्या बेडरूममध्ये उभी राहून तिचा मोबाईल फोन ग्राहकाकडे दाखवत असल्याचे दिसून येते. सुरुवातीला, ग्राहकाने तिला घराबाहेर पडण्यास सांगितले. "घर में खडे रह के बदतामीजी नहीं करना," असे महिला व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. मालिश करणारी व्यक्ती प्रतिकार करते आणि ती तिचे कृत्य रेकॉर्ड करत असल्याचे सांगते तेव्हा ती तिची बॅग हिसकावून घेताना दिसते.
advertisement
काही क्षणातच, दोघीही एकमेकींना मारू लागतात, नंतरच्या दृश्यांमध्ये महिला ग्राहकाने मालिश करणाऱ्याला बेडवर फेकून दिलेले दिसत आहे. नंतर, मालिश करणाऱ्या महिलेने ग्राहकाचे केस धरले आहेत. "ती एक वेडी महिला आहे. ती माझ्या घरात आली आणि माझ्या आईला मारहाण करू लागली," असे महिलेच्या मुलाने घटनेचे रेकॉर्डिंग करताना ऐकू येते. "पोलिसांना फोन करेन, तुझे करिअर संपवतो," असे तो पुढे म्हणतो.
advertisement
#WATCH | Mumbai: Urban Company Masseuse As*aults Woman After Session Cancelled; Video Captures Incident #MumbaiNews #Crimenews pic.twitter.com/QOHQ1eHd3r
— Free Press Journal (@fpjindia) January 23, 2026
शहनाज वाहिद सय्यद यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिला वडाळा पूर्व भागातील भक्ती पार्क येथे तिच्या 18 वर्षांच्या मुलासह राहते. खांद्याच्या दुखण्यामुळे महिलेने अर्बन कंपनीमार्फत मसाज सर्व्हिस बुक केली होती. थेरपिस्टचा पोर्टेबल मसाज बेड खराब स्थितीमध्ये आणि घरासाठी योग्य नसल्याचं महिलेला आढळलं, त्यानंतर तिने अपॉइंटमेंट रद्द केली. अपॉइंटमेंट रद्द केल्यामुळे दोन्ही महिलांमध्ये वाद सुरू झाले, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मसाजसाठी आलेल्या महिलेने आपले केस ओढले, डोळ्याला दुखापत केली आणि जमिनीवर ढकललं, असा आरोप शहनाज यांनी केला आहे.
advertisement
आरोपी महिलेची ओळख अश्विनी शिवनाथ वर्तपी (वय 34) अशी झाली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 (2) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलमांखाली आरोपी महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहनाज यांनी 21 जानेवारीला याप्रकरणी पोलीस तक्रार केली होती, पण अजून आरोपी महिलेला अटक करण्यात आली नाही. महिलेला दंडाधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान अर्बन कंपनीशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून उत्तर येत नसल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
advertisement
दरम्यान घटनेला उत्तर देताना अर्बन कंपनीने सांगितले की ते पोलिसांना सहकार्य करत आहेत. मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार 'आम्ही आरोप झालेल्या महिलेला काढून टाकलं आहे', असं कंपनीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स प्रतिनिधी भव्य शर्मा यांनी सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 'झिंज्या उपटल्या, बेडवर फेकलं', मसाजवालीने ग्राहकाला चोपलं, मुंबईतला शॉकिंग Video









