तसेच घटनेची वाच्यता केल्यास संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू आणि जीवे मारू, अशी धमकीही आरोपींनी दिली. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला सोडून दिलं. आरोपींच्या धमकीला घाबरलेल्या मुलीनं सुरुवातीला घडलेला प्रकार कुणालाच सांगितला नाही. मात्र तिच्या वागण्यातील बदल कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईनं पोलीस ठाणं गाठून दोन्ही आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांचा माग घेतला जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे गुंडाने आणि त्याच्या साथीदाराने अत्याचार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २५) उघडकीस आली. नंदनवन येथील आरोपींनी बिडगाव याच परिसरातील एका लॉजवर या पीडित मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेचा अधिक तपास नंदनवन पोलीस करत आहेत.
