TRENDING:

मंदिराच्या पडक्या विहिरीत आढळला मुंडकं नसलेला मृतदेह, नागपुरातील खळबळजनक प्रकार

Last Updated:

Nagpur Crime News: नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nagpur Crime News: नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील आग्याराम देवी मंदिराच्या पाठीमागे एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये डोके नसलेला मानवी सांगाडा आढळून आला आहे. हा सांगाडा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असून, त्याचा एक हात आणि डोके गायब आहे. त्यामुळे, अज्ञात व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून ही विहीर बंद होती. काही दिवसांपूर्वी विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा सांगाडा आढळून आला. हा प्रकार उघडकीस येताच स्थानिकांनी तत्काळ घटनेची माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मानवी सांगाडा ताब्यात घेतला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.

सापडलेल्या या अर्धवट मानवी सांगाड्यामुळे हत्येचा संशय बळावला आहे. पोलिसांनी विहिरीतून मिळालेल्या सांगाड्याचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर, गेल्या काही महिन्यांत शहरात बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मंदिराच्या पडक्या विहिरीत आढळला मुंडकं नसलेला मृतदेह, नागपुरातील खळबळजनक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल