नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्याबाबत बोलनं टाळलं आहे. विशाल पाटील यांच्याबद्दल आमच्याकडे माहिती नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी म्हटलं की, हे खरं आहे की जागा वाटपामुळे सर्वच समाधानी नाही, ज्या जागा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, वर्षाताई आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीला गेल्या, होत्या त्यात काही वावगं नाही.
advertisement
दरम्यान आज सलमान खान याच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली, यावर देखील पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. अनेक घटना घडत आहेत, आता सलमानच्या घरासमोर गोळीबार झाला, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
