TRENDING:

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांची होणार डोळे तपासणी, अपघात टाळण्यासाठी उपाय

Last Updated:

समृद्धी महामार्गावरील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांची डोळे तपासणी करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी नागपूर प्रादेशिक परिवहन विभागानं हा उपक्रम हाती घेतलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 31 जुलै : समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने वेगवेगळे उपाय केले जात आहेत. आता नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांनी ही माहिती दिली.
अपघात टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावर होणार चालकांची डोळे तपासणी
अपघात टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावर होणार चालकांची डोळे तपासणी
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  समृद्धी महामार्गावरील प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांची डोळे तपासणी करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी नागपूर प्रादेशिक परिवहन विभागानं हा उपक्रम हाती घेतलाय. बस, ट्राव्हल्स, मिनी बसमध्ये प्रवाशी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांचे डोळे तपासणी आणि काही समस्या असल्यास उपचारही केले जाणार आहे.

मुंबईत दारुच्या नशेत तरुणाने भरधाव चालवली कार; चार गाड्यांना धडक, एकाचा मृत्यू

advertisement

वाहनचालकांचं व्हीजन कमी झाल्यानं अनेक अपघात झाल्याची बाब समोर आलीय. त्यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकाची डोळे तपासणी करुन त्यांना निःशुल्क चष्मा दिला जाणार आहे. बुलडाणा येथे बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर आरटीओकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

समृद्धी महामार्गावर 5 महिन्यातील अपघात आणि मृतांची आकडेवारी, राज्य सरकारने कारणेही सांगितली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात 358 अपघात, 95 लोकांचा मृत्यू झाल्याची राज्य सरकारची विधान परिषदेत सांगितले. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, वाहन अवैध्यरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे, चालक सतर्क न करणे ही समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
समृद्धी महामार्गावर वाहन चालकांची होणार डोळे तपासणी, अपघात टाळण्यासाठी उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल