मुंबईत दारुच्या नशेत तरुणाने भरधाव चालवली कार; चार गाड्यांना धडक, एकाचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भुलाभाई देसाई मार्गावर रविवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. यामध्ये पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई, 31 जुलै : दक्षिण मुंबईत महालक्ष्मी मंदिराजवळ भुलाभाई देसाई मार्गावर भीषण अपघात झाला आहे. दारुच्या नशेत असलेल्या कार चालकाने भरधाव वेगात चार गाड्यांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुलाभाई देसाई मार्गावर रविवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. यामध्ये पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भुलाभाई देसाई रोडवर सागर विला बिल्डिंगसमोर ही घटना घडली. या प्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
आरोपी रौनक समीर गणात्रा हा दारुच्या नशेत होता. त्याने एसयुव्ही कार भरधाव वेगात चालवून पार्क असलेल्या मोटर कारना धडक दिली. या अपघातात अंशुकुमार सकिंदर रायज याचा मृत्यू झाला. तर धर्मेंद्र राय याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भा द वि कलम 304(2),338,279 व 184,185, 134(अ)(ब) मोटरवाहन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
वरळी सी लिंकवर गाडी बाजूला लावली आणि केलं धक्कादायक कृत्य
वांद्रे वरळी सी लिंक हा मुंबईची शान मानला जातो. मुंबईतील सी लिंकवर कोणाला थांबू दिलं जात नाही. मात्र असं असतानाही एक व्यक्तीनं गाडी सी लिंकवर बाजूला पार्क केली. त्याने तिथून खाली उडी मारली आहे. या व्यक्तीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेची माहिती मिळताच नौदलाची टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सी लिंकवरुन समुद्रात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2023 2:07 PM IST


