TRENDING:

चौकात घेरलं, काचा फोडल्या, वर्ध्यात दरोडेखोर गँगला पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक, पाहा VIDEO

Last Updated:

Crime in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील बोरी येथे एका दुकानदाराला देशी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: नागपूर जिल्ह्यातील बोरी येथे एका दुकानदाराला देशी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना वर्धा पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. वर्ध्यात आल्यानंतर हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि अटक करण्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील बोरी येथे काही आरोपींनी एका दुकानदाराला देशी कट्टा दाखवून दरोडा टाकला होता. ही घटना घडल्यानंतर आरोपी वर्ध्याच्या दिशेने पळाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नागपूर पोलिसांनी तत्काळ वर्धा पोलिसांना याबाबत माहिती दिली. आरोपी वर्ध्यात आल्याची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.

वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी शहरातील मस्जिद चौकात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली. अटकेचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. ज्यात पोलिसांनी दोन बाजुने गाड्या लावून आरोपीच्या गाडीला ट्रॅप केलं आणि त्यानंतर कारवर हल्ला करत चार जणांना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रवींद्र सिंग लखन सिंग जुनी (रा. कारला चौक, हनुमानगड, वर्धा), तुषार दामोदर सहारे (रा. वार्ड नंबर चार, दुर्गा मंदिर जवळ, बुटीबोरी, नागपूर), नयन दत्ताजी कडू (रा. संयोग कॉलनी, कारला रोड, पिपरी मेघे, वर्धा) आणि कुणाल हेमने (रा. सिम्बोसिस कॉलेज जवळ, खरबी, नागपूर) अशी आहेत. यातील एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
चौकात घेरलं, काचा फोडल्या, वर्ध्यात दरोडेखोर गँगला पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल