TRENDING:

काय समजेना, दिवसा उन्हाचे चटके, रात्री हवेत गारवा; विचित्र हवामानाचे कारण काय? Video

Last Updated:

सध्या ऑक्टोबर हिटमुळे लोक हैराण झाले आहेत. दिवसा उन्ह आणि रात्री गारवा असं का होतंय? इथं पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 18 ऑक्टोबर: देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असतांना अद्याप उन्हाच्या झळा काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. निम्म्याहून अधिक ऑक्टोबर महिना निघून गेला असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप लागलेली नाही. मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना राज्याच्या सर्वच जिल्हातील तापमानात काही अंशी वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत.
advertisement

उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली असल्याने सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यातील निम्म्याहून अधिक काळ होत आला तरी अद्याप हिवाळ्याची चाहुल लागलेली नाही. तर गेल्या काही दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यामधील तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आले आहे. उन्हाळ्या इतक्याच या झळा असह्य होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या विषयी नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आगामी बदलांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

advertisement

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना ताप

पहाटे आणि रात्री गारवा तर दुपारच्या वेळी तीव्र उन्हामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता सारेच गोड गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत आहे. उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या झळा उन्हाळ्या इतक्याच असह्य असल्याने नागरिकांना दिवसा गर्मीसह, उकडा सहन करावा लागतो आहे.

advertisement

भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसून 80 प्रवाशांना लुटलं; नागपूरमधील विचित्र घटनेनं खळबळ

नागपुरातील तापमान

आज नागपुरात किमान तापमान 33.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.0 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेले तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे. किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने विदर्भासह मराठवाडा व अन्यत्र ठिकाणची जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. दरम्यानच्या काळात पारा अंशतः कमी झालेला असला तरी आगामी काळात स्थिती आटोक्यात येईल असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

advertisement

नागपूरकरांना घाम

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे नागपूरकरांचा चांगलाच घाम फोडला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोबर हिटची दाहकता अधिक जाणवण्याची शक्यता असते. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान दोन डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान तीन ते चार डिग्रीने अधिक आहे.

ऑक्टोंबर शेवटपर्यंत परिस्थिती आटोक्यात

या दिवसातील तापमान वाढीविषयी बोलायचे झाल्यास आपल्या येथे प्रामुख्याने दोन ऋतू मुख्य असतात. उन्हाळा आणि हिवाळा. तर मधल्या काळात जो ऋतू असतो तो पावसाळा असतो. या दरम्यान जो काळ असतो आणि जो सध्या सुरू आहे तो समर मान्सून असतो. आपल्या इथे उन्हाळा हा मार्च एप्रिलमध्ये सुरुवात होतो आणि तो सप्टेंबर पर्यंत चालतो. सप्टेंबर महिन्यानंतर या ऋतूमध्ये परिवर्तन होतांना जाणवत असते, असे नागपूर प्रादेशिक विभागाचे उपमहानिर्देशक एम एल साहू म्हणाले.

advertisement

मनोकामना पूर्ण करणारी आग्याराम देवी, नागपूरच्या नगरदेवीबद्दल माहितीये का?

ऑक्टोबर महिन्यात आपण हिवाळ्याकडे वळत असतो. या काळात पाऊस थांबतो आणि दिवसा गर्मी व रात्री किमान तापमान कमी कमी होत जाते. म्हणूनच ऑक्टोंबर महिन्यामध्ये हिट जास्त असल्याचे जाणवते. शिवाय वातावरणातील आद्रता कमी झाल्याने सूर्यकिरणे अधिक तीव्र जाणवतात. मात्र ही परिस्थिती साधारण असून आगामी काळात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत ही सर्वसाधारण परिस्थिती राहील, अशी माहिती साहू यांनी दिली.

विदर्भातलं कमाल तापमान

सध्या विदर्भातील अकोला येथील कमाल तापमान 36.0 अंश सेल्सिअस हे सर्वधिक नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल ब्रह्मपुरी कमाल तापमान 35.8 तर किमान 23.6 अंश सेल्सिअस, वाशिम 35 अंश सेल्सिअस, वर्धा 34.5 अंश सेल्सिअस, यवतमाळ 35.2 अंश सेल्सिअस अमरावती 35.अंश सेल्सिअस, बुलढाणा 33.5 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 34.0 अंश सेल्सिअस, गडचिरोली 34.0 अंश सेल्सिअस, गोंदिया 33.0 अंश सेल्सिअस, नागपूर 33.8 अंश सेल्सिअस, असे नोंदविण्यात आले आहे.

विदर्भातलं किमान तापमान

नागपूरच नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. नागपूर जिल्ह्यातील कमाल तापमान 20.0 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला 22.2 अंश सेल्सिअस वर आहे. अमरावती 21.6 ब्रह्मपुरी 23.7 चंद्रपूर 22.0 , गडचिरोली 20.0, गोंदिया 21.4 बुलढाणा 21.4, वर्धा 21.6, वाशिम 19.2, यवतमाळ 19.0 इतके नोंदविण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
काय समजेना, दिवसा उन्हाचे चटके, रात्री हवेत गारवा; विचित्र हवामानाचे कारण काय? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल