TRENDING:

Maharashtra Local Body Election: राजकारण लैय वंगाळ अन् क्रूर, निवडणूक लढवण्यासाठी पोटच्या पोरीला संपवलं, नांदेड हादरलं!

Last Updated:

Local Body Election: राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड: राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी आडकाठी ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
राजकारण लैय वंगाळ अन् क्रूर, निवडणूक लढवण्यासाठी पोटच्या पोरीला संपवलं, नांदेड हादरलं!
राजकारण लैय वंगाळ अन् क्रूर, निवडणूक लढवण्यासाठी पोटच्या पोरीला संपवलं, नांदेड हादरलं!
advertisement

नेमकी घटना काय?

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुड गावातील रहिवासी असलेला आरोपी आपल्या गावात केशकर्तनालय चालवतो. त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याला सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र निवडणूक कायद्यातील 'दोन अपत्यांच्या' अटीमुळे तो अपात्र ठरत होता. ही अट पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या ६ वर्षांच्या मुलीचा काटा काढण्याचे ठरवले.

advertisement

पाच दिवसांनंतर गुन्ह्याचा उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या मुलीला दुचाकीवर बसवून तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याच्या दिशेने नेले. तिथे एका निर्जन स्थळी असलेल्या कालव्यात त्याने मुलीला जिवंत फेकून दिले. काही दिवसांनी स्थानिकांना कालव्यात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

निझामाबाद पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर आणि आसपासच्या परिसरात प्रसारित केले. मुखेडमधील काही नागरिकांनी मुलीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निवडणुकीसाठी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.

advertisement

कायद्याचा अजब धसका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या रक्ताच्या नात्याला संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Election: राजकारण लैय वंगाळ अन् क्रूर, निवडणूक लढवण्यासाठी पोटच्या पोरीला संपवलं, नांदेड हादरलं!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल