TRENDING:

महिलेची छेड काढल्याचा आरोप, दवाखान्यात जाऊन डॉक्टरला चोपला, Video वाऱ्यासारखा पसरला

Last Updated:

नांदेडमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला दवाखान्यात जाऊन मारहाण करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोप आहे. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड : नांदेडमध्ये महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शासकीय रूग्णालयात मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील कौठा भागातील महापालिकेच्या रूग्णालयात हा प्रकार घडला. महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा डॉक्टरवर आरोप आहे.
नांदेडमध्ये डॉक्टरला मारहाण
नांदेडमध्ये डॉक्टरला मारहाण
advertisement

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद कुंटूरकर हे याच शासकीय रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास देत असल्याचा आरोप आहे. त्यांनी महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. महिला कर्मचारी आपल्या नातेवाईकांसह रुग्णालयात गेली होती. यावेळी डॉक्टर भालाप्रसाद कुंटूरकर आणि महिलेमध्ये शाब्दिक वाद देखील झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

वादावादीनंतर महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर कुंटूरकर यांना मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मारहाणीच व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलेची छेड काढल्याचा आरोप, दवाखान्यात जाऊन डॉक्टरला चोपला, Video वाऱ्यासारखा पसरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल