खून करणारा मुलगा देखील अल्पवयीन असून त्याचे वय 16 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुखेड तालुक्यातील राजुरा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. मुक्रमाबाद पोलीस खुनाचा तपास करीत आहेत.
मूळचा अंबुलगा येथील राहुल येरगे हा राजुरा येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होता. राजुरा येथील जत्रेत तो आला असताना अल्पवयीन आरोपीने त्याच्या पोटात चाकू खुपसला. चाकू पोटातून आरपार गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान, या प्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. युवकांच्या जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
December 04, 2025 9:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तो यात्रेला आला... अल्पवयीन मुलाने थेट पोटात चाकू खुपसला, राहुल जागेवर गेला
