या घटनेमध्ये एका कार्यक्रमासाठी अनेक लोक जमलेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजेही लावण्यात आला होता. मात्र, अचानक डीजे लावलेल्या बोलेरो गाडीचे ब्रेक फेल झाले. यानंतर ही गाडी थेट कार्यक्रमासाठी बसलेल्या लोकांच्या अंगावर गेली. गाडी अंगावरुन गेल्याने या घटनेत तब्बल 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडली.
advertisement
Jalgaon News : पोहण्यासाठी धरणात उडी मारली तसाच चिखलात अडकला; जळगावातील घटनेने हळहळ
किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे बंजारा समजाचा तिज महोत्सव सुरू होता. या कार्यक्रमासाठी अनेक लोक जमले होते. तसंच या महोत्सवासाठी डीजेही लावण्यात आला होता. बोलेरो पिकअप गाडीवर हा डीजे होता. मात्र, गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं.
चालकाचं नियंत्रण सुटताच ही गाडी कार्यक्रमातील लोकांच्या अंगावर गेली. गाडी अंगावर चढल्याने कार्यक्रमातील लोक जखमी झाले. यात महिला आणि मुलांसह एकूण 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तर, गंभीर जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मात्र, या घटनेनं कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.