आमच्या पोरीपासून दूर राहा, आंचलच्या आईची धमकी
सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी जाऊन धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. तिथं जाऊन तिने आमच्या पोरीपासून दूर राहा, असं म्हणत सक्षमला धमकी दिली होती. यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे याची आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली, अशी माहिती सक्षमच्या आईने दिली आहे.
advertisement
आंचल पोलीस स्टेशनमध्ये भेटली अन्...
सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. ती खूप रडत होती आणि माझ्याबरोबरच ती घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं, तसंच प्रेम मी आंचलवरही सुनबाई म्हणून करेन, असंही सक्षमच्या आईने म्हटलं आहे.
आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो
सक्षमचा वाढदिवस आहे. वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. आम्ही लग्न करण्याचं ठरवलं होतं. आम्ही जेव्हा जेव्हा पण भेटायचो त्यावेळी मी त्याला लग्नासंदर्भात बोलत होते. त्याच्या वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. मात्र त्यानं माझ्या वडिलांचा कायम आदर करत आपण सर्वांची परवानगी लग्न करु, असा विश्वास तो मला द्यायचा, असं आंचल म्हणाली होती.
माझ्या मुलाला न्याय मिळावा - सक्षमची आई
दरम्यान, आंचलने माझी साथ सोडली नाही, तर मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा, असंही सक्षमच्या आई म्हणाल्या आहेत.
