TRENDING:

Nanded Crime : आरोपीचा पोलिसावर खंजरने हल्ला; पायात गोळी झाडून अटक, नांदेडमध्ये सिनेस्टाईल थरार

Last Updated:

Nanded Crime : नांदेड जिल्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने खंजरने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड, 27 सप्टेंबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात आरोपीला पकडताना सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असेलल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने खंजरने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जायबंदी केलं. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात हा थरार घडला.
आरोपीचा पोलिसावर खंजरने हल्ला
आरोपीचा पोलिसावर खंजरने हल्ला
advertisement

आरोपी-पोलिसांमध्ये सिनेस्टाईल थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आवेझ उर्फ अबू शूटर आणि दिपक बोकरे हे दोघे अनेक गंभीर गुन्हात फरार आरोपी आहेत. हे दोघेही तरोडा नाका भागात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांतर्फे पोलिसाना मिळाली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. पोलिसांना पाहून दोन्ही आरोपी पळाले. त्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग सुरू झाला. एका शाळेजवळ अबु शूटर याने विद्यार्थ्याची स्कूटी हिसकवण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याला पोलिसांनी गाठले. तेव्हा अबू शूटर याने खंजरने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलिसांना दुखापत झाली. प्रतिउत्तरात पोलिसांनी अबू शूटरच्या पायावर गोळी झाडून त्याला अटक केली. दरम्यान, यावेळी दिपक बोकरे पळून जाण्यात यशस्वी झाला.

advertisement

पोलीस अधिकाऱ्यावरच ब्लेडने हल्ला

अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी कफ परेड परिसरात घडली. याठिकाणी शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुलाम मुस्तफा शेखला अटक केली असून आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. जखमी पोलिस उपनिरीक्षक रूपेशकुमार भागवत कफ परेड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी शेखला ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

advertisement

वाचा - 'माझ्या बायकोचं अफेअर आहे'; पतीने व्हिडिओ शूट करत संपवलं जीवन, सांगलीतील घटना

जखमी पोलीस अधिकाऱ्यावर या घटनेनंतर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपी गुलाम मुस्तफा शेख वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात असल्याची माहिती कफ परेड पोलिसांना मिळाली होती. त्या वेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गेले असता आरोपीने ब्लेड काढून धाक दाखवत धमकी दिली. पोलीस त्याला ताब्यात घेत असताना त्याने भागवतांवर ब्लेडने हल्ला केला. त्यात भागवत यांच्या हाताला तीन ते चार जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शेखला अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Crime : आरोपीचा पोलिसावर खंजरने हल्ला; पायात गोळी झाडून अटक, नांदेडमध्ये सिनेस्टाईल थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल