जातीय हल्ल्यात तो निर्घृणपणे मारला गेलाय - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या प्रकरणावर वक्तव्य केलं. माझी पत्नी अंजली आंबेडकर आज नांदेडमध्ये सक्षम ताटेची आई आणि आंचलला यांना भेटण्यासाठी येणार आहे. सक्षम हा 20 वर्षांचा बौद्ध तरुण होता. त्याच्या आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी केलेल्या जातीय हल्ल्यात तो निर्घृणपणे मारला गेला होता. अंजलीसोबत वंचित आघाडीच्या नांदेड जिल्हा पदाधिकारी असतील कारण आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत एकता व्यक्त करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
आंचलला किती दुःख आणि विश्वासघात...
अंजली आणि मी आंचलला किती दुःख आणि विश्वासघात सहन करावा लागत आहे याची कल्पना करू शकत नाही. अकल्पनीय नुकसानाच्या वेळी तिचे धाडस दुर्लक्षित राहू नये. सक्षमला न्याय मिळायला हवा. सक्षमच्या आईला न्याय मिळायला हवा. वंचित आघाडी सक्षमला न्याय मिळण्यासाठी त्यांना पाठिंबा देईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी
दरम्यान, नांदेडमधील या भयंकर घटनेनंतर आंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला. एवढ्यावर न थांबता तिने स्वतःच्या वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसात धाडसाने साक्षही दिली आहे. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील आंचलने केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अवघ्या 12 तासात अटक केली आहे.
