TRENDING:

Ladki Bahin Yojana : 'सख्या बहिणीची काजळी घेतली नाही आणि...' सुषमा अंधारेंचा अजितदादांना टोला

Last Updated:

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुन सरकारला टोला लगावला आहे. सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकाने बंद करा, असं आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या.
सुषमा अंधारेंचा अजितदादांना टोला
सुषमा अंधारेंचा अजितदादांना टोला
advertisement

..तर महिला सुखी होतील : अंधारे

लाडकी बहीण योजनेवरुन बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, की पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते? मालक धडधाकट कमवतो, पण येताना पावशेर मारतो. आकडे खेळतो, अशा धंद्यातच त्याची सर्व कमाई जाते. जर एवढी काळजी असेल तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना या बहिणींचं कल्याण करण्यासाठी दारूचे धंदे बंद करावे असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या पंधराशे मागणार नाही, महिला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

advertisement

वाचा - शिंदे गटाचे मिलिंद मोरे यांचा मारहाण झाल्याने मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

अजित पवारांनी सख्ख्या बहिणींची काळजी घेतली नाही, आपली कोण घेतो : सुषमा अंधारे

लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे? असा सवाल करुन सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. आणि एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे नको दाजीला नोकरी द्या, दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Ladki Bahin Yojana : 'सख्या बहिणीची काजळी घेतली नाही आणि...' सुषमा अंधारेंचा अजितदादांना टोला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल