Thane News : शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद मोरे यांचा मारहाण झाल्याने मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

Last Updated:

Thane News : ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुखाचा मुलगा मिलिंद मोरे यांच्या मृत्यूमागचं कारण समोर आलं आहे.

News18
News18
विरार, (राजा मयाल, प्रतिनिधी) : विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. विरार येथील अर्नाळा येथे सेवेन सी रिसॉटमध्ये रविवारी ही घटना घडली. घटनेपूर्वी मिलिंद मोरे यांचा एका रिक्षाचालकाशी वाद झाला होता. यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? याबद्दल तर्कवितर्क रंगवले जात होते. मिलिंद मोरे यांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे.
काय आहे मृत्यूचं कारण?
मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवार असल्याने ठाण्यावरून मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह 15 ते 20 जणांसोबत आले होते. यावेळी मोरेंच्या पुतण्याचा पाय रिक्षा खाली आल्याने रिक्षावाल्यासोबत त्यांचा वाद झाला होता. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात मिलिंद आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती.
advertisement
यात वादविवाद सुरी असताना मिलिंद मोरे अचानक चक्कर येवून कोसळले, त्यांना तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं. मात्र तेथे त्याला मयत घोषित करण्यात आलं. मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरारचे शिंदे गटाचे तालुखा प्रमुख यांनी घटनेच गंभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करून स्वतः मुख्यमंत्री यांनी डीसीपी जयंत बजबळे यांच्याशी चर्चा केली. योग्य ती कारवाही करण्याचे आदेश दिल्याचे शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी सांगितले आहे.
advertisement
वाचा - यशश्री शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर आला, महत्त्वाची माहिती समोर
मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाण झाल्यानंतर हार्टअटॅकने झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर उघड झाल आहे. मिलिंदच वय 50 वर्ष असून, दिवंगत आनंद दिघेनंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे होते. याच रघुनाथ मोरे यांचा मिलिंद हा मुलगा होता. या घटनेत मयत मिलिंद यांचा चुलता आणि पुतण्या जखमी झाला आहे. चुलत्याच्या नाकावर चार टाके पडले असून पुतण्याच्या पायला गभीर दुःखप्त झाली आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल असून मारहाण करणारे आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अरुणा नवापूर समुद्र किनाऱ्यावरील अनाधिकृत रिसॉर्टचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद मोरे यांचा मारहाण झाल्याने मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement