मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघातात चांदशैली घाटात झाला. यावेळी अस्तंबा यात्रेवरून काही भाविक पीकअप वाहनाने पुन्हा आपल्या घरी परतात होते. पण हा घाट चढताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी काही मीटर खोल दरीत कोसळली. या अपघात इतका भीषण होता की जागीच सहा भाविकांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं. बचावकार्य सुरू आहे. गंभीर जखमींनी अन्य ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे. पीकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवल्याने हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
खरं तर, चांदशैली हा सातपुडा पर्वत रांगेतील अत्यंत अवघड घाट समजला जातो. या घाटात अनेक नागमोडी वळणं आणि तीव्र चढ उतार आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये मर्यादीत प्रवासी घेऊन जावं लागतं. असं असताना अस्तंबा यात्रेवरून भाविकांना घेऊन हे वाहन चांदशैली घाटात आलं आणि अपघाताची घटना घडली. अस्तंबा यात्रा ही आदिवासी समुदायासाठी अत्यंत पवित्र आणि मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेसाठी मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातून आदिवासी बांधव जात असतात. दरम्यान, ऐन दिवाळीत अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे.