अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव यानेच ते व्हिडीओ लीक केल्याचे सांगितले जाते. अशोक खरात याचे ५८ व्हिडीओ नीरज जाधव याच्याकडे होते. त्याने एका महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी संबंधित व्हिडीओचा वापर केला असता तो पोलिसांच्या रडारवर आला. शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
कॅप्टन खरात आणि नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच तू तू मैं मैं
advertisement
भोंदू कॅप्टन खरातची गेल्या पाच तासांपासून एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. नीरज जाधव आणि कॅप्टन खरात या दोघांना समोरासमोर बसवून पोलीस चौकशी करीत आहेत. चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधवमध्ये माहिती देण्यावरून शाब्दिक खडाजंगी झाल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. अटकेची कारवाई केल्यापासून आज पहिल्यांदाच नीरज जाधव आणि कॅप्टन खरात या दोघांची समोर बसवून पोलिसांनी चौकशी केली.
तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून चौकशी
भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करिता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
तेजस्वी सातपुते यांच्याकडून 'कॅप्टन'ची दोन तास चौकशी
एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात याची तब्बल दोन ते तीन तास कसून चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.
सहा वर्षांपूर्वी पीडितेशी ओळख, सातत्याने अत्याचार अन् धमकी
२०१९ साली कॅनडा कॉर्नर येथे पीडितेशी अशोक खरात याची ओळख झाली. माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून अशोक खरात याने महिलेचा विश्वास संपादन केला. महिलांच्या दैनंदिन आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अशोक खरात विविध विधी करीत असे. अशोक खरात याच्याशी ओळख झाल्यानंतर आणि चांगली मैत्री झाल्यानंतर २०२१ मध्ये पीडितेचा साखरपुडा मोडला. महिलेकडून ५० हजार उकळत तिला पुष्कराज खडा दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये खरातने पीडितेला कार्यालयात बोलावलं. प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी दिल्याने तिला गुंगी आली. भीती दाखवत कॅप्टन खरातने महिलेवर अत्याचार केला.
