TRENDING:

Nashik News : ओव्हरलोड ट्रकचा भयंकर अपघात, धावता धावता अचानक पलटी, प्रवाशांचा काळजा ठोका चुकवणारा VIDEO

Last Updated:

मनमाड जवळील पुणे-इंदौर महामार्गांवर घडली आहे. या घटनेत ओव्हरलोड झालेला ट्रक पलटी झाल्याची घटना धडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
nashik news
nashik news
advertisement

Nashik News : बब्बू शेंख,मनमाड : देशभरात दररोज अपघाताच्या अनेक घटना घडत असतात.या घटना पाहून मन सून्न होतं असतं. कधी कधी या अपघातात इतर वाहन चालकांच्या चुकांमुळे निष्पाप लोकांचे जीव जात असतात. असाच निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. या घटनेत ओव्हरलोड ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात पाहून काळजाचा ठोका चूकतोय.

advertisement

ही घटना मनमाड जवळील पुणे-इंदौर महामार्गांवर घडली आहे. या घटनेत ओव्हरलोड झालेला ट्रक पलटी झाल्याची घटना धडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही आहे. पण ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना ट्रकच्या मागून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

advertisement

मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहवयाचा मिळाला असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक एका बाजूने झुकलेला असताना देखील चालकाने त्याची परवा न करता ट्रक चालवीत होता अखेर मनमाड पासून काही अंतरावर एका बाजूने तोल जाऊन धावता ट्रक पलटी झाला.सुदैवाने ट्रक डाव्या बाजूने पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टाळला. ट्रक पलटी झाल्यामुळे चालक जखमी झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एका बाजूने ट्रक झुकल्याचे पाहून त्याच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने ट्रक पलटीचा थरार त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला.

advertisement

महार्गावर अनेक मालवाहू ट्रक हे असेच ओव्हरलोड असतात.या मालवाहू ट्र्कमुळे आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. ओव्हरलोड माल भरून हे ट्रक कधी ब्रिजखाली अटकतात, तर कधी पलटी होतात. यामुळे अनेक अपघात घडतात. त्यामुळे ओव्हर लोड माल भरून अनेक ट्रक हायवे वरून धावत असतांना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News : ओव्हरलोड ट्रकचा भयंकर अपघात, धावता धावता अचानक पलटी, प्रवाशांचा काळजा ठोका चुकवणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल