TRENDING:

नाशिक महापालिका सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Nashik Election 2026 : नाशिक महापालिकेत भाजपला स्वतंत्रपणे स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : महापालिकेत भाजपला स्वतंत्रपणे स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला होता. मात्र या प्रस्तावात कोणत्याही सत्तापदांची ठोस वाटणी नसल्याने शिवसेना शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त करत प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे.
nashik election 2026
nashik election 2026
advertisement

भाजपचा ‘बिनअटी’ प्रस्ताव आणि सेनेची नाराजी

भाजपने महापालिकेत स्थिर सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या नावाखाली मित्रपक्षांना ‘बिनअटी’ पाठिंब्याचे आवाहन केले होते. मात्र या प्रस्तावामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती किंवा अन्य महत्त्वाच्या पदांबाबत कोणतीही स्पष्ट हमी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपल्याकडे लक्षणीय संख्याबळ असतानाही केवळ बाह्य पाठिंब्याच्या भूमिकेत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षांतर्गत चर्चांमध्ये केला जात आहे.

advertisement

चार नगरसेवकांचे अर्ज, राजकीय समीकरणात खळबळ

दरम्यान, सोमवारी शिवसेना शिंदे गटाच्या चार नगरसेवकांनी थेट महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने महापालिकेतील सत्तासंघर्षाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. ज्येष्ठ नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह रंजना बोराडे, सुवर्णा मटाले आणि राहुल दिवे यांनी प्रत्येकी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरले आहेत. या हालचालीमुळे शिवसेना सत्तेत सहभागी होणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

स्थानिक नेत्यांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर

शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाने महापालिकेतील संपूर्ण राजकीय परिस्थितीचा सविस्तर अहवाल मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्याकडे सोमवारी (दि. २) सादर केला आहे. सध्याच्या परिस्थितीत सत्तेत सहभागी होणे पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल की विरोधात बसून स्वतंत्र राजकीय भूमिका घेणे योग्य ठरेल, यावर सखोल चर्चा सुरू आहे.

advertisement

अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंकडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

शिवसेना शिंदे गट सत्तेत सहभागी होणार की भाजपविरोधात ठाम भूमिका घेणार, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती पक्षाचे उपनेते व महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली. वरिष्ठ पातळीवरून निर्देश मिळाल्यानंतरच पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापालिका सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल