तिची फसवणूक झाल्याचं तिला हळूहळू लक्षात आलं. पती पुरुष नाही तर नपुंसक आहे हे घरच्यांना माहीत असतानाही सासरच्यांनी ते लपवून ठेवलं आणि जेव्हा हे सत्य तरुणीला समजलं तेव्हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. हुंड्यासाठी मागणी होऊ लागली.
'नवसाचा' बनाव अन् मित्राशी जवळीक
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपासून पतीने पत्नीला स्पर्श करणं टाळलं. कारण विचारलं की तो सांगायचा, "माझा नवस आहे, शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत!" पत्नी देवावर विश्वास ठेवून गप्प बसली. पण हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. पतीचा कल आपल्याकडे नसून त्याच्या एका पुरुष मित्राकडे अधिक आहे, हे तिला जाणवू लागलं. जेव्हा तिने उपचाराचा आग्रह धरला, तेव्हा तिला प्रेमाऐवजी लाथाबुक्क्यांनी मारहाण मिळाली.
advertisement
१५ लाखांचा रेट आणि दागिन्यांची लूट
क्रूरतेचा कळस म्हणजे, पतीने आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी पत्नीलाच एटीएम बनवलं. नाशिकला फ्लॅट घ्यायचाय, माहेरून १५ लाख आण, तरच तुझ्याशी बोलेन, अशी अट घातली. इतकंच नाही, तर तिचं सोनं-नाणं आणि तिच्याकडचे पैसेही बळजबरीने सासरच्यांनी काढून घेतले. तिला मारहाण केली. शैक्षणिक कागदपत्रंही सासरच्या १० जणांनी पळवून नेली. तिची ओळख पुसून तिला घरात एखाद्या कैद्यासारखं वागवलं गेलं.
६ सप्टेंबरची ती काळी रात्र...
६ सप्टेंबरला तिला इतक्या निर्दयीपणे मारण्यात आलं की तिचा जगण्यावरचा विश्वासच उडाला. २१ जानेवारी २०२६ पर्यंत हा छळ सुरू होता. अखेर पदर सावरत तिने छावणी पोलीस गाठले आणि पती, सासू, नणंद, दीर अशा १० जणांविरुद्ध तक्रार दिली. रोजच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे न्याय मागितला. या घटनेची चर्चा सुरू झाली आणि आता पीडितेला न्याय कधी मिळतो याकडे लक्ष आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
