TRENDING:

लघुशंका पाजायचा, डोक्यावर तांब्या ठेवत अश्लील कृत्य, अशोक खरातचे VIDEO व्हायरल, सेलिब्रिटी महिलाही पडल्या बळी?

Last Updated:

Ashok Kharat News: मर्चंट नेव्हीतून निवृत्त होऊन स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ashok Kharat News: मर्चंट नेव्हीतून निवृत्त होऊन स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली ही अटक केली आहे. या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तपासादरम्यान एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता त्याचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात तो एका महिलेसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

अशोक खरातच्या व्हायरल व्हिडीओत काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी अशोक खरात हा एका महिलेसोबत अश्लील कृत्य करत आहेत. तिला पाठमोरी उभं करून तिच्या डोक्यावर तांब्या ठेवून आरोपी खरात अत्याचार करताना दिसत आहे. धार्मिक विधीच्या बहाण्याने अशाप्रकारे विकृत चाळे तो करत असल्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

advertisement

अशाच प्रकारचे आरोपीच्या पेनड्राईव्हमध्ये तब्बल ५८ अश्लील व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. काही व्हिडीओमध्ये तो महिलांना आपली लघुशंका पाजत असल्याचा दावा देखील केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

advertisement

सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. 'तुझा पती मरेल, तुला बरबाद करेन' अशी भीती दाखवून आरोपी पीडितेवर अत्याचार करत होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपी खरातला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
लघुशंका पाजायचा, डोक्यावर तांब्या ठेवत अश्लील कृत्य, अशोक खरातचे VIDEO व्हायरल, सेलिब्रिटी महिलाही पडल्या बळी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल