TRENDING:

अशोक खरातच्या अटकेसाठी पोलिसांचं 'मिशन तृप्तबाला', बरमुड्यात बाहेर अन् थेट उचललं, ज्योतिषाचे कसे फिरवले ग्रह

Last Updated:

Ashok Kharat Nashik News: स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्र हादरला आहे. अनेकांचं भविष्य सांगणाऱ्या या ज्योतिषाचे पोलिसांनी कसे ग्रह फिरवले, याचीच ही स्टोरी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्र हादरला आहे. एका ३५ वर्षीय महिलेनं दिलेल्या बलात्कार आणि छळाच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी खरातला अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात जे पुरावे हाती आले आहेत, ते पाहून पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. मात्र आता खरातच्या अटकेची स्टोरी समोर आली आहे.
Ashok Kharat 58 abused video leak
Ashok Kharat 58 abused video leak
advertisement

अशोक खरातला अटक कशी केली?

बुधवारी १८ मार्चला रात्री उशिरा पोलिसांनी अशोक खरातला अटक केली. अटकेच्या वेळी तो राहात असलेला कर्मयोगीनगर परिसर सामसूम होता. लोकांची रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. असं असलं तरी खरातचं राजकीय कनेक्शन आणि त्याची चलाखी पाहता, अटकेची कुणकुण लागली तरी खरात पळून जाईल, अशी भीती पोलिसांना होती. तसेच थेट अटक करायला पोहोचलो, तर खरात काहीतरी कांगावा करेल, त्यामुळे पोलिसांना त्याच्या भक्त वर्गाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी भीती होती. त्यामुळे त्याला अटक कसं करायचं याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं.

advertisement

यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी मास्टर प्लॅन आखला. साध्या वेशातील पोलिसांनी खरातच्या 'तृप्तबाला' बंगल्याला वेढा दिला. याचवेळी तीन चार तरुण चोर आले... चोर आले... असं ओरडत धावू लागले. सामसूम असलेल्या रस्त्यावर अचानक कालवा ऐकून घराबाहेर नक्की काय गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी खरात घराबाहेर आला. तो घराबाहेर येताच आधीच सापळा रचून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. ज्यावेळी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो हाफ बरमुड्यावर होता. आपल्यासोबत काय होतंय, हे कळायच्या आधीच पोलिसांनी खरातला गाडीत टाकलं आणि अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अधिकारी असल्याचं सांगतो. निवृत्तीनंतर त्याने ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाने नाशिकमध्ये आपले जाळं विणलं होतं. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याचं 'ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स' नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयात येणाऱ्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री एका फिल्मी स्टाईल सापळ्यात खरातला अटक केली.

advertisement

तपासात धक्कादायक खुलासे: १०० हून अधिक व्हिडिओ

सुरुवातीला तपासादरम्यान पोलिसांना ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सापडला होता. मात्र, एसआयटी (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सखोल चौकशीत आता हा आकडा १०० च्या पार गेला आहे. खरातने आपल्या कार्यालयात छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, ज्याद्वारे तो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करत असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

advertisement

हायप्रोफाईल नेत्यांशी कनेक्शन?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

अशोक खरातचे संबंध केवळ सामान्य लोकांशीच नाहीत, तर राजकीय नेते, मोठे उद्योजक आणि सेलिब्रिटींशी देखील असल्याचे समोर आले आहे. त्याच्या कार्यालयात अनेक बड्या हस्तींचे येणे-जाणे होते. जप्त केलेल्या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि अधिकाऱ्यांचे चेहरे असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने उच्चपदस्थ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खरातच्या फार्म हाऊसवर केलेल्या छाप्यात पिस्तूल, जिवंत काडतूसं आणि सुमारे ८ लाखांची रोकड जप्त केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातच्या अटकेसाठी पोलिसांचं 'मिशन तृप्तबाला', बरमुड्यात बाहेर अन् थेट उचललं, ज्योतिषाचे कसे फिरवले ग्रह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल