यासाठी तो नाशिकमधील नामांकित डॉक्टरांची मदत घेत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'न्यूज १८ मराठी'ला दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जात होती औषधे?
अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आधीच उघड झालं आहे. मात्र, आता तपासात असा संशय व्यक्त केला जात आहे की, पीडित महिलांना गर्भधारणा होऊ नये यासाठी खरात काही विशिष्ट गोळ्या आणि औषधे देत होता. ही औषधे तो स्वतःच्या मनाने देत होता की नाशिकमधील काही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला याचा पुरवठा होत होता? या दिशेने 'एसआयटी' आता कसून तपास करत आहे.
advertisement
संमोहन आणि औषधांचा वापर?
या प्रकरणातील सर्वात भयावह बाब म्हणजे, महिलांना संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट 'मेडिसीन'चा वापर केला जात होता का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबांनुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांना नेमके काय व्हायचे, हे अनेकदा समजत नसे. त्यामुळे त्यांना गुंगीचे औषध किंवा संमोहित करणारी औषधं दिली जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.
SIT च्या तपासात मोठे मासे अडकणार?
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थापन करण्यात आलेले एसआयटी पथक आता तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांकडे वळले आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या क्लिनिक किंवा मेडिकल स्टोअर्समधून कोणत्या प्रकारच्या औषधांची खरेदी-विक्री झाली, याचा रेकॉर्ड तपासला जाण्याची शक्यता आहे. यातून नाशिकमध्ये बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
