नाशिक - शेतीमधून हवे तसे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी आता पूरक व्यवसायातून उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. दिंडोरी रोडवरील मसरूळ येथील शेतकरी संतोष सोनवणे यांनीदेखील शेतीला जोडधंदा म्हणून 4 वर्षांपूर्वी मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. आता ते त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. जाणून घेऊयात, त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
कोरोना काळात संतोष यांचा हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने ते कर्जबाजारी झाले. तरीसुद्धा कुठेही न मागे राहते आणि न डगमगता त्यांनी काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा या विचारातून मस्त्यपालन व्यवसायाची निवड केली. कमीत कमी जागेत उभारता येणाऱ्या हा व्यवसायाने त्यांचे लक्ष वेधले. त्यांनी बायोपिक फिश फार्मिंगची माहिती त्यांनी मिळवली. परंतु त्यावेळी कोरोनाकळ असल्यामुळे पुरेशी माहिती त्यांना मिळत नसल्याने 8 ते 8 महिने संतोष यांनी वैयक्तिक अभ्यास करून या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
यानंतर त्यांनी मत्स्य पालनाला अल्पशा 5 टाक्यांपासून सुरुवात केली. पूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर त्यांनी हा प्रकल्प उभारत असल्याचे सांगितले. सुरुवातीच्या काळात 2 लाखापासून त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली. त्यानंतर वाढती कमाई आणि इतरांना याची माहिती होण्याकरीता त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत विकास विभागाद्वारे सेवा केंद्र सुरू केले. या सेवा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली इतरत्र 12 प्रकल्प यशस्वीरित्या त्यांच्यामार्फत सुरू करण्यात आली. तर 26 लाभार्थी या योजनेच्या लाभ घेत आहेत. आणखी 850 टाक्यांच्या माध्यमातून या क्षेत्राला गती देण्याचे त्यांचे ध्येय आहे.
इतरांनाही देतात प्रशिक्षण -
दिंडोरी रोडवरील त्यांच्या मत्स्य सेवा केंद्राच ते इतरांना दोन दिवसीय मोफत प्रशिक्षण सुद्धा देत असतात. सुरुवातीच्या काळात 5 टाक्यांपासून सुरू केलेल्या या व्यवसायात आज ते महिन्याला 4 ते 5 लाखांचे उत्पादन काढत आहे. इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा कमीत कमी वापर करून हे उत्पादन घेतले जाते. 6 ते 7 महिन्यात हे उत्पादन विक्री योग्य होत असते. त्याचप्रमाणे एका टाकीमध्ये 30 हजार लीटर पाणी भरले जाते. ते 6 महिन्यापर्यंत बदलण्याची वेळ येत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
pitru paksha 2024 : पितृपक्षातील 'या' 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO
त्यामध्ये एका टाकीत 3 हजार बीज टाकले जातात व त्यामध्ये सरासरी 20 टक्के मर पडली जाते. यामध्ये तीन प्रजातीची माशांची उत्पादने घेतली जातात. यामध्ये चिपला, मरळ मासा, गोल्डन फिश यांचे उत्पादन अधिक घेतले जाते. 50 टक्के गुंतवणूक व 50 टक्के उत्पादन नफा, असे या उत्पादनात मिळू शकते. हे मासे स्थानिक बाजारपेठेत 300 रुपये प्रति किलोपर्यंत तर घाऊक बाजारपेठेत 200 रुपये प्रति किलोपर्यंत विकले जातात. यासाठी सरकारकडूनही अनेक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO
त्यामुळे हा नवीन व्यवसाय सुरू करून अनेक जण आपले काम करू शकते आणि याबद्दलची काही माहिती लागल्यास संतोष सोनवणे हे मोफत इतरांना पुरवत असतात. नाशिकमध्ये दिंडोरी रोडला त्यांचे नासिक बायोफ्रॉक या नावाने फिश फार्मिंग केंद्र आहे. या ठिकाणी ते नेहमी इतरांना मोफत मार्गदर्शन देण्यासाठी उपलब्ध असतात.