TRENDING:

Gold Silver Today Rate: चांदी १७ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? जळगावच्या सराफा बाजारातून गुढी पाडव्याआधी गुड न्यूज!

Last Updated:

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याचे भाव कोसळल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी, जळगाव: मराठी नववर्षाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याचे भाव कोसळल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुढी पाडव्याआधीच गुड न्यूज समोर आल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
चांदी १७ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? जळगावच्या सराफा बाजारातून गुढी पाडव्याआधी गुड न्यूज!
चांदी १७ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? जळगावच्या सराफा बाजारातून गुढी पाडव्याआधी गुड न्यूज!
advertisement

चांदीच्या दरात १७ हजार ५०० रुपयांची घसरण, सोनं किती स्वस्त?

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता असूनही, गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर झालेल्या 'नफा वसुली'मुळे दरात ही कपात पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात १७ हजार ५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केवळ २४ तासांत सोन्याचे दर १ हजार ५०० रुपयांनी, तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

advertisement

सध्याचे दर काय?

जळगाव सराफ बाजारातील ताज्या माहितीनुसार, सध्या जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६४ हजार रुपये प्रति तोळा आहे. चांदीचा दर २ लाख ६८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सततच्या दरवाढीमुळे धास्तावलेल्या ग्राहकांसाठी ही घसरण म्हणजे गुढीपाडव्याची आगाऊ भेटच मानली जात आहे.

बाजारात खरेदीचा उत्साह वाढणार!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वयंपाक घराचा खर्च वाढला, मसाल्यांच्या दरात मोठी वाढ, कारण काय?
सर्व पहा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता दरात मोठी कपात झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. "दरात झालेली ही घसरण व्यापारी म्हणून चिंतेची असली, तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यामुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल," असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Gold Silver Today Rate: चांदी १७ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? जळगावच्या सराफा बाजारातून गुढी पाडव्याआधी गुड न्यूज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल