TRENDING:

Jalgaon: मित्रांकडून विश्वासघात, हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच संपवलं जीवन, चिठ्ठीत मांडल्या व्यथा

Last Updated:

नशिराबाद शहरातील एका हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: नशिराबाद शहरातील प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी नशिराबाद येथील हॉटेल आस्वाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती मिळाली असून त्या चिठ्ठीत त्यांनी परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
News18
News18
advertisement

सहकारी मित्रांकडून त्रास

प्रमोद पाटील यांनी परेश पाटील यांच्यासोबत भागीदारीतून हॉटेल आस्वाद सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. दरम्यान, संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्या मालकीची असल्याने त्यांनी अचानक हॉटेल खाली करण्यास सांगितल्याचे समजते. त्याबदल्यात कोणताही मोबदला देण्यास ते तयार नसल्यामुळे प्रमोद पाटील यांना मानसिक त्रास होत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती मिळाली आहे. सहकारी मित्रांनी अशाप्रकारे ऐनवेळी विश्वासघात केल्याने ते मानसिक तणावात होते.

advertisement

या मानसिक तणावातूनच प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. दरम्यान, संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मृतदेह नशिराबाद पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला होता. पोलीस प्रशासनाकडून योग्य तपास करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी नशिराबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

हॉटेल व्यावसायिक प्रमोद पाटील यांनी लिहिलेली सुसाईड नोट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

आत्महत्या केलेल्या प्रमोद यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नव्हती यामुळे प्रमोद पाटील यांच्या नातेवाईकांनी थेट मृतदेह नशिराबाद पोलीस स्थानक या ठिकाणी आणला आणि मृत प्रमोद पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली. यावेळी काही वेळ नशिराबाद पोलीस ठाणे का बाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Jalgaon: मित्रांकडून विश्वासघात, हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच संपवलं जीवन, चिठ्ठीत मांडल्या व्यथा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल