TRENDING:

खरात खरंच देवाचा अवतार? महिलांना कसं भुलवायचा? स्वत:च सांगितलं बंद खोलीत चालणारं कांड

Last Updated:

अशोक खरातनं अखेर तोंड उघडलं आहे. त्याने बंद खोलीत चालणाऱ्या काळ्या करारनाम्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे दररोज नवनवीन कांड समोर येत आहेत. आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल झाले आहेत. भविष्य सांगण्याच्या आणि अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी जवळपास १०० हून अधिक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १८ मार्चला खरातला अटक केली होती. अटक झाल्यापासून अशोक खरात तोंड उघडत नव्हता. पोलिसांना तपासात सहकार्य करत नव्हता. मात्र आता खरातनं तोंड उघडलं आहे. त्याने बंद खोलीत चालणाऱ्या काळ्या करारनाम्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
अशोक खरातची मोठी कबुली
अशोक खरातची मोठी कबुली
advertisement

अशोक खरात याने महिलांना धमकी देऊन, घाबरवून आणि हातचलाखीचा वापर करून भुलवल्याची माहिती दिली आहे. महिलांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचं खरातने सांगितलं आहे. शिवाय 'झुकती है दुनिया, बस्स झुकानेवाला चाहिए' असं वाक्य वापरत अशोक खरातने आपल्या काळ्या कृत्याचा पाढा वाचला आहे. मात्र हे करत असताना आपण महिलांना जाळ्यात ओढण्याच्या प्रकाराला त्याने विज्ञानाची ट्रीक असल्याचं सांगितलं आहे.

advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने पोलीस कोठडीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली असली तर त्याला याबाबत कसलाही पश्चाताप व्यक्त केला नाही. उलट, त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या 'ट्रिक्स'ला विज्ञानाचं नाव दिलं आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्याने महिलांना वश केलं, असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

भोंदू खरातने पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केलं. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचं त्याने मान्य केलं. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून त्याने महिलांना भुलवल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातने स्वत:च कथित दैवी शक्तीमागचं थोतांड उघड केलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

त्यामुळे तो देवाचा अवतार नव्हता, असंच अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खरात याच्या कबुली जवाबानंतर एसआयटी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे. तपासातील विविध खुलासे एसआयटीकडून पुढे आणण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यात नेमका काय खुलासा होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
खरात खरंच देवाचा अवतार? महिलांना कसं भुलवायचा? स्वत:च सांगितलं बंद खोलीत चालणारं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल