TRENDING:

'तुझा नवरा मरेल', विवाहितेवर 2 वर्षे अत्याचार, अशोक खरातला अटक कशी झाली? Inside Story

Last Updated:

एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. आता या अटकेमागची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी खरात हा मागील दोन वर्षांपासून पीडित विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. तुझ्या पतीचा मृत्यू होईल, अशी भीती घालून कॅप्टन खरात महिलेवर अत्याचार करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याला कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली.
अशोक खरातला अटक कशी झाली? Inside Story
अशोक खरातला अटक कशी झाली? Inside Story
advertisement

आता या अटकेमागची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. खरंतर, अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध होते. तो विविध नेते, सेलिब्रिटींचं भविष्य बघायचा. त्यामुळे त्याच्याबद्दल राजकीय नेत्यांच्या मनात आदर- सन्मान होता, अशा स्थितीत जर आरोपी अशोक खरात याला अटकेची कुणकुण लागली असती तर त्याने अटकेपासून बचावाचा काही ना काही मार्ग काढला असता. राजकीय ताकद वापरली असती.

advertisement

ही बाब लक्षात घेऊन नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अशोक खरातला अटक करण्यासाठी एक वेगळाच प्लॅन केला होता. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर घुसल्याचा बनाव केला होता. चोराला पकडण्यासाठी पोलीस संबंधित परिसराची झडती घेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होता. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी आरोपी अशोक खरातच्या घराची देखील झडती घेतली. याच वेळी अशोक खरात घरात दिसताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

एवढंच नव्हे तर पोलिसांनी अशोक खरातच्या फार्महाऊसवर देखील छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. त्याने जमा केलेल्या संपत्तीचे विविध कागदपत्रे देखील पोलिसांना सापडली आहेत. एवढंच नव्हे तर फार्महाऊसमधून पोलिसांनी एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसं देखील जप्त केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केला असता कोर्टानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. आरोपीनं अशाप्रकारे आणखी कुणावर अत्याचार केला का? याचा तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'तुझा नवरा मरेल', विवाहितेवर 2 वर्षे अत्याचार, अशोक खरातला अटक कशी झाली? Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल