नाशिक - सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या जलोष्षात आणि आनंदमय वातावरणात साजरा होत आहे. अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. नवरात्रीत भाविक आपल्या आदिशक्ती आदीमायेला आपल्या श्रद्धेनुसार काही ना काही भेटवस्तू अर्पण करतात आणि साकडे घालतात. अनेक ठिकाणी जुन्या प्रथेप्रमाणे देवीला प्रसाद स्वरुपात बळीही अर्पण केला जातो. नवरात्री असो अथवा देवीची कुठलीही पूजा, त्यात देवीला बळी अर्पण करण्याची प्रथा जुन्या काळापासून चालत आली आहे. तसेच अनेक भाविक हे मुक्या प्राण्यांचाही आजवर बळी अर्पण करत आले आहेत. पण देवीला बळी नेमका कशा स्वरुपात द्यावा तसेच का दिला जातो, याबाबत महंत अनिकेत शास्त्री यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, बळी हा हिंदू धर्मातील सर्वात गैरसमज असलेला शब्द आहे, अगदी हिंदूंनीही त्याला मान्यता दिली आहे. बळी म्हणजे नेहमीच प्राणी अथवा कोणाचा जीव घेणे, मारणे असा होत नाही. बळी पीठम किंवा बळी हरना मानतपम हे आगमा प्रणालीचे अनुसरण करणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये आहे. हे सहसा ध्वजस्तंभाच्या बाहेर असते आणि पक्ष्यांना खाण्यासाठी असते.
देव कोणत्याही जातीचा असो, दयाळू आहे. त्याला कुठल्याही प्रकारे मुक्या प्रायांची हत्त्या केलेले चालत नाही. तोच स्वतः निर्माता असताना देवाला त्याच निमितीचे प्रमाण आपण देत असतो. आपण मानवांव्यतिरिक्त इतर प्राण्यांना बळी स्वरूपात वितरित केले जात असतो. पुराणिक भाषेत देवाला बळी देणे म्हणजे कुठल्याही पोषक अशा आहाराचा किंवा फळांचा नैवद्य देणे होय. ही प्रथा यज्ञ कुंडात अर्पण करुन केली जाते. मात्र, अनेकांनी त्याचा गैरसमज केला आहे.
पुण्याच्या मुळशीत 'ड्रोन पॅटर्न', रात्रीच्या अंधारात फिरतात गावांवर, पोलिसांनी सांगितलं खरं कारण!
आपल्या पुराणात बळीचा अर्थ म्हणजे अर्पण करणे आहे. नवरात्रीत देवीला कोहळा हा बळी स्वरूपात पूर्वी पासून देण्यात आला आहे. कोहळा हे फळ पौस्टिक असून देवी देवतांना नैवद्य म्हणून अर्पण केला जातो. तसेच बळीमध्ये अनेक प्रकार आहेत. पायास बळी आणि कुष्मांड बळी असतात. तसेच भगवंत कुठेही नरबळी आणि पशु बळी मागत नाही.
हिंदू धर्मातील शास्त्रांमध्ये नारळ, फळ आणि विविध धान्य हे बळी देण्यासाठी सांगितले गेलेले आहेत. त्यातील कुष्मांड हे फळ देवीला अत्यंत प्रिय आहे. कुष्मांड हे पेस्टीक आणि नकारात्मक ऊर्जेला हटविणारा एक मूळ घटक आहे. तसेच ते प्रसाद म्हणून मानवी शरीरासाठी देखील उपयोगी आहे. त्यामुळे भगवतीला हा नवरात्रीत अर्पण केला जात असतो, अशी मुख्य माहिती हिंदू पौराणात दिलेली असल्याचे महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.