"इंडिया एआय समिट 2026" या कार्यक्रमामध्ये 'महाराष्ट्र पवेलियन' अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या एआय प्रोजेक्ट्सचे निरिक्षण केले. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यांतील वेगवेगळ्या कामांचा पाठपुरावा केला. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी बनवलेल्या एआय आधारित ॲपचेही अनावरण केले. ज्याचे नाव, 'कुंभदूत' असं आहे. हा संपूर्ण ॲप AI आधारित असून हाय-टेक सारथीच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला आणि नाशिक महानगर पालिकेला या ॲपचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
कुंभमेळ्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर, देशभरातून आणि जगभरातून करोडो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. यापूर्वी 2015 मध्ये कुंभमेळा पार पडला होता. आता त्यानंतर 2026 मध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनवलेला हा ॲप भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणार आहे. 'कुंभदूत' ॲप लाखो भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यात आणि आपत्कालीन सेवांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हे ॲप भाविकांना केवळ रिअल-टाइम माहितीच देणार नाही, तर प्रशासनाला योग्य सुरक्षा योजना तयार करण्यासही मदत करेल. 'कुंभदूत' 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामुळे प्रत्येकजण हा ॲप अगदी सोप्प्या पद्धतीने हाताळू शकणार आहे.
