TRENDING:

लोकांना वाचवण्यासाठी धाव घेणाऱ्या पोलिसांकडूनच धक्कादायक कृत्य, तरुणाचा जागेवरच मृत्यू, नाशिकमधील घटना

Last Updated:

एरवी अपघातस्थळी पोलीस धाव घेत असतात, पण पोलिसांच्याच गाडीने अपघात झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चांदवड : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  चांदवड जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.  मालेगावच्या पोलीस जीपने एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातातच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, चांदवडच्या मंगरूळ फाट्या जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी ही घटना घडली. रमेश गारे असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे.  रमेश गारे हे आपल्या दुचाकीवरून घरी येत होते. त्याचवेळी नाशिककडे जाणाऱ्या मालेगावच्या रमजानपुरा पोलीस स्टेशन बोलेरोनं दुचाकीला मागून जबर धडक दिली. पोलिसांच्या गाडीचा वेग जास्त होता. हा अपघात इतका भीषण होता की, पोलिसांच्या गाडीची धडक बसल्यानंतर रमेश गारे हे दूरपर्यंत फेकले गेले. जबर धडक बसल्यामुळे रमेश गारे यांचा जागेवर मृत्यू झाला.

advertisement

एरवी अपघातस्थळी पोलीस धाव घेत असतात, पण पोलिसांच्याच गाडीने अपघात झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रमेश गारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांच्या गाडीने अपघात कसा झाला, याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. या प्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची गाडी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

एर्टिंगा आणि एसटी बसची समोरासमोर धडक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, मुंबईजवळील कर्जतमध्ये असाच एक अपघात घडला आहे.  कर्जत चौक रोडवर पनवेलहून कर्जतकडे येणारी एसटी आणि कर्जतहून चौक खालापूरकडे जाणारी मारुती सुझुकी एर्टिगा कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ए र्टिगामधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांना रायगड हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. जखमी युवक वांगणी येथील असल्याचं समजतंय. अपघाताची माहिती मिळताच कर्जत आणि खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना हॉस्पिटल दाखल केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
लोकांना वाचवण्यासाठी धाव घेणाऱ्या पोलिसांकडूनच धक्कादायक कृत्य, तरुणाचा जागेवरच मृत्यू, नाशिकमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल