न्युज 18 लोकमतच्या बातमीची मनसेकडून दखल
नाशिकमध्ये मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या वादावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. न्युज 18 लोकमतने दाखवलेली बातमी ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी हिंदी भाषिकांना गंभीर इशारा दिला आहे. "नाशकात मराठी माणसाला कार्यक्रमात प्रवेश नाही? एवढा माज? कुमार विश्वासला जर हिंदी भाषिकांसाठी कार्यक्रम करायचे असतील तर दिल्लीत करावे. महाराष्ट्रात ही नाटके खपवून घेतली जाणार नाहीत. इथे 'ठाकरेंचा' राज चालतो.", असा इशारा शालिनी ठाकरेंनी हिंदी भाषिकांना दिला आहे. कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या काव्य संमेलनाला मराठी भाषिकांना काल नाकारला प्रवेश होता. हिंदी प्रसारण सभेच्या वतीने नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानंतर सर्वात अगोदर न्यूज 18 लोकमतनेच बातमी दाखवली होती.
advertisement
जाहिरात केली पण पास कुठे मिळतात हे सांगितलं नाही
कुमार विश्वास यांच्या कार्यक्रम नाशिकमध्ये ) असल्याचं नाशिकच्या चौकाचौकात लावण्यात आले आहेत. हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिकद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती मात्र कुठेही देण्यात आली नाही. या कार्यक्रमाची जाहिरात ही मराठी वृत्तपत्रातही देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणीही याच्या पास वा तिकीटाची माहिती दिलेली नाही.
वाचा - Nashik News: पार्टीसाठी नेऊन प्रेयसीच्या नवऱ्याची केली हत्या; बापानेही दिली लेकाची साथ
पास मिळाला नसल्याने आरोप
कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला नसल्याने काहींनी चुकीचे आरोप केले असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. जागा कमी आणि लोक जास्त झाल्याने, योग्य नियोजन न झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.