नाशिकमध्ये एबी फॉर्म मिळवण्यासाठी निष्ठावंतांना आमदाराच्या कारचा पाठलाग करण्याची वेळ आली. काहींना तर रस्त्यावर उभं राहून तोंड झोडून घ्यावं. पक्षानं उमेदवारी दिली नाही म्हणून अनेकांना रडावं लागलं. त्याचं मुख्य कारण होतं, ते पक्षात आलेले उपरे. निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालं होतं.
उपऱ्यांच्या घरात तीन तीन उमेदवारी
advertisement
सुधाकर बडगुजर,दिनकर पाटील, शाहू खैरे, विनायक पांडे, प्रशांत दिवे, रत्नमाला राणे, अशोक मुर्तडक, यतीन वाघ यांच्या सारख्या दिग्गजांना भाजपनं पक्षात प्रवेश दिला. इतकंच नव्हे तर त्यांना उमेदवारी देत निवडून आणण्याचा शब्दही दिला. उपऱ्यांच्या घरात तीन तीन उमेदवारी देण्यात आल्या. त्यामुळेच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना भाजपमधील निष्ठावंतांनी व्यक्त केली.
एकाच घरातून तब्बल तीन जणांना उमेदवारी
नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी झालेला पाठलाग, कार्यकर्त्यांनी केलेला राडा यामुळे भाजपची राज्यभरात प्रतिमा मलिन झाली. या सर्व प्रकरणी पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवला जाईल, अशी सारवासारव शहराध्यक्षांनी केली. सुधाकर बडगुजर यांनी एकाच घरातून तब्बल तीन उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत तीन AB फॉर्म जोडले.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवण्याचा निर्णय
त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाग्यश्री ढोमसे यांचा एबी फॉर्म निवडणूक आयोगाने बाद ठरवला. दिनकर पाटील, अमोल पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या प्रेम पाटील, सविता गायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर विनायक पांडे, शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश मोरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
