TRENDING:

Nashik News: 6 महिला अन् एक एंजट, बांगलादेशी घुसखोरांचं धक्कादायक कांड, नाशिकमध्ये मोठी कारवाई

Last Updated:

Nashik News: नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सहा बांगलादेशी महिलांसह एका एजंटला पकडण्यात आले आहे. तपासात मोठी साखळी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध नाशिक पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने शनिवारी (दि. 27) पांडव लेणी परिसरातील कवठेकर वाडीत धाड टाकून, विनापरवाना राहणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक केली. धक्कादायक म्हणजे, या महिलांना आश्रय देणाऱ्या आणि बनावट कागदपत्रे पुरविणाऱ्या एका एजंटलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Nashik News: 6 महिला अन् एक एंजट, बांगलादेशी घुसखोरांचं मोठं कांड, नाशिकमध्ये मोठी कारवाई
Nashik News: 6 महिला अन् एक एंजट, बांगलादेशी घुसखोरांचं मोठं कांड, नाशिकमध्ये मोठी कारवाई
advertisement

बनावट आधारकार्डचा 'बुरखा' फाटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलांकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा नव्हता. उलट, त्यांच्या मोबाईलमध्ये 'गव्हर्नमेंट ऑफ पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश' ची मूळ ओळखपत्रे आणि भारतात राहण्यासाठी बनवलेली बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड मिळून आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आहे.

चिमुकल्याला झोपवलं, चिठ्ठी लिहिली अन् 5 महिन्यांच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल..., संभाजीनगर हादरलं

advertisement

अटक करण्यात आलेल्यांची नावे:

  • शिल्पी मोहम्मद शुकरअली अक्तर
  • सौम्या संतोष नायक ऊर्फ सुलताना शब्बीर शेख
  • मुनिया खातून टुकू शेख
  • सोन्या कबिरुल मंडल ऊर्फ सानिया रौफिक शेख
  • मुक्ता जोलील शेख
  • शामोली बेगम ऊर्फ शामोली सामसू खान
  • एजंट: लकी ऊर्फ लियाकत हमीद कुरेशी (रा. भारतनगर)

वर्षभरात 19 बांगलादेशींची घुसखोरी उघड

advertisement

नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात घुसखोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध भागांतून एकूण 19 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे:

  • फेब्रुवारी: आडगावमध्ये 8 मजूर सापडले.
  • जून: एक बांगलादेशी तरुणी आणि तिचा भारतीय पती ताब्यात.
  • जुलै: अमृतधाम परिसरात 4 महिलांचे वास्तव्य उघड.
  • डिसेंबर: पांडव लेणी परिसरात ताज्या कारवाईत 6 महिलांना अटक.
  • advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं
सर्व पहा

या घुसखोरीमागे पश्चिम बंगाल आणि कोलकाता (हावडा) मार्गे सक्रिय असणारी 'एजंट्सची मोठी साखळी' असल्याचे तपासात समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. या प्रकरणातील 'बॉबी' नावाच्या दुसऱ्या संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: 6 महिला अन् एक एंजट, बांगलादेशी घुसखोरांचं धक्कादायक कांड, नाशिकमध्ये मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल