चिमुकल्याला झोपवलं, चिठ्ठी लिहिली अन् 5 महिन्यांच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल..., संभाजीनगर हादरलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो…” अशा आशयाच्या ओळी तिने लिहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : हर्सल परिसरात 23 वर्षांच्या एका गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयशा अरबाज शेख असे मृत महिलेचे नाव असून ती पाच महिन्यांची गर्भवती होती. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या गर्भात जुळी अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येपूर्वी आयशाने एक सुसाइड नोट लिहिली होती. “अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो…” अशा आशयाच्या ओळी तिने लिहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने फसवणूक करत दुसरे लग्न केले होते तसेच सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
advertisement
या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून हर्सल पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अरबाज सलीम शेख, सासू सायरा सलीम शेख आणि अलीम सलीम शेख (सर्व रा. भिवंडी, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
आयशाचा विवाह 2022 मध्ये अरबाज शेख याच्याशी झाला होता. विवाहानंतर पतीने व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत छळ सुरू केल्याचा आरोप आहे. आयशा दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने 13 नोव्हेंबर रोजी पतीने तिला माहेरी सोडून दिले होते.
नव्या पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, 25 डिसेंबर रोजी आयशाने आपल्या लहान मुलाला बाजूला झोपवून बेडरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
आयशाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
view comments‘मैं कहां आ के फंस गई, कहां से मैंने शादी की और क्यों की? अच्छी लाइफ थी, और अब देखो मुझे उनमें कोई दिलचस्पी नहीं है, क्योंकि वह मुझसे प्यार नहीं करते. अब सिर्फ मेरे बच्चे के लिए रह रही हूं. मैं ऐसा नहीं है कि मैंने प्यार नहीं किया. बहुत प्यार किया मैंने. लेकिन अंजाम ज्यादा बुरा मिला. किसी को बोल भी नहीं सकती हूं. क्या बोलना, अब भरोसा भी नहीं है. हर बार बस सोनी.. सोनी.. सोनी मेरा मूड खराब हो जाता है. सोनी का नाम सुनकर. जाने दो क्या बोलना. मनहूस है. तू है या तो मैं हूं करना मैं परेशान हो गई हूं बहुत. अरबाज के घरवाले बहुत परेशान करते हैं. और यह भी मैं भी इंसान हूं. मेरी भी लाइफ है, मेरी भी ख्वाहिशें हैं. लेकिन तू नहीं है. अब जो है बच्चे हैं मुझे उनको देखना है. उनको नहीं फिक्र. लेकिन मुझे तो है ना. कभी मैंने चोट दी तो मेरी बेबी की जान जाएगी. आय हेट माय लाइफ. मेरे दिल में नहीं अब कोई भी और होगा मुझे. अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो....’
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 3:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चिमुकल्याला झोपवलं, चिठ्ठी लिहिली अन् 5 महिन्यांच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल..., संभाजीनगर हादरलं









