'आई-बाबा परगावी राहण्याची भीती वाटते..'; नोकरी मिळाली, सत्कार झाला पण दुसऱ्याच क्षणी सगळं संपलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: बुलढाण्याच्या तरुणाला छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकरी मिळाली. शाळेत सत्कारही झाला. परंतु, काही तासांतच भयानक घडलं.
छत्रपती संभाजीनगर: नोकरी मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आणि यशही मिळालं. शाळेत सत्कारही झाला. पण 22 वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजीनगरात टोकाचं पाऊल उचललं. राम आत्माराम मछले असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलढाण्यातील उंदरीचा आहे. नोकरी मिळाल्यानंतर काही तासांतच रामने गळफास घेऊन जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवारी समोर आली असून नेमके कारण अद्याप समजले नाही.
रामला आघूर येथील राजे संभाजी विद्यालयात लॅब असिस्टंटची नोकरी मिळाली होती. नोकरीसाठी तो मंगळवारी आई-वडील व भावासोबत आघूर येथे आला. विद्यालयात रुजू होताच त्याचा सत्कार करण्यात आला. गावात राहण्यासाठी स्वतंत्र खोलीही करून देण्यात आली होती. मात्र, परगावी राहण्याची अस्वस्थता आणि मनातील दडपण त्याला सतावत होते. त्याने आपल्या नाराजीची भावना आई-वडिलांकडे व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर परिसरात मुक्काम करून आई-वडिलांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो तयार झाल्यानंतर बुधवारी दुपारी कुटुंबीय त्याला पुन्हा आघूर येथे सोडून गावी परतण्यासाठी निघाले.
advertisement
रामने दुपारी 12 वाजता कुटुंबीय निघून गेल्यानंतर काही वेळातच आपल्या खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'आई-बाबा परगावी राहण्याची भीती वाटते..'; नोकरी मिळाली, सत्कार झाला पण दुसऱ्याच क्षणी सगळं संपलं








