TRENDING:

Nashik Water: नाशिककरांची पाणी समस्या कायमची मिटणार? नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून मान्यता

Last Updated:

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांची पाण्याची समस्या अखेर आता कायमची सुटणार आहे. अनेक तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांना भेडसवत असणारी पाण्याची समस्या अखेर लवकरच मिटणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: मालेगावामध्ये राज्य सरकारने नदी जोड प्रकल्पाला शासकीय परवानगी दिलेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नार- पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारने परवानगी दिली आहे. काही टप्प्यांमधून हा संपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये नार- पार- औरंगा या तीन पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाणी गिरणा खोऱ्यात वळवण्याचा निर्णय अद्याप बाकी आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
News18
News18
advertisement

या तिनही खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्यात कशा पद्धतीने वळवण्यात येईल, याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून शासन स्तरावर घेतला जात आहे. त्या अनुषंगाने टप्प्या टप्प्यांमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. चणकापूर धरणातून डावा कालव्याचे पाणी गिरणा खोऱ्यात वळवल्यामुळे अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे. कळवण, सटाणा आणि मालेगाव तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागांना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. कालव्याचे सविस्तर सर्वेक्षण करून कालव्याच्या निर्णयाची मागणी दादा भूसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे बोलले जात आहे.

advertisement

नदी जोड प्रकल्पाचा मालेगावासह अनेक तालुक्यातील गावांना याचा फायदा होणार आहे. कळवण- जयपूर, गोसराणे, गोपालखडी, जामनेपाळे, रवखजी, देसराणे, दरेभणगी, मोकभणगीपासून भादवणपर्यंत सटाणा, डांगासौंदाणे, दहिंवुले, चाफ्याचा पाडा, कपालेश्वर, किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, विंचूर, डोंगरेंज, विरगाव, आव्हाटी, बंधारपाडा, भुयाणे, निताणे, पारनेर, लाडुद, सोमपूर, डांगसौंदाणे ते सटाणा, कपालेश्वर ते सटाणा, विरगाव ते वटार, भुयाणे ते आसखेडा, सोमपूर ते नामपूर, मालेगाव ते वळवाडे, खाकुर्डी, वडनेर, अजंग, वडेल, काष्टी, वजीरखेडे, वडगाव आणि मालेगाव अशा गावांचा फायदा होणाऱ्या गावांमध्ये समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

मार्च महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील गावांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक किलोमीटर वरून नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. धरण आणि नदीच्या तिरांवरून नागरिकांना कालव्याद्वारे गुरूत्वीय पद्धतीने पाणी देणे शक्य होणार आहे. लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. यामुळे अनेक नद्या पुन्हा पुनर्जिवित होणार आहेत. या नद्यांचा फायदा अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुद्धा उत्तम रित्या होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Water: नाशिककरांची पाणी समस्या कायमची मिटणार? नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून मान्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल