TRENDING:

Nashik News : पाणी येणार की जाणार? नाशिककरांच्या गोंधळावर महापालिकेचे स्पष्टीकरण; जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

Nashik Water Cut News : नाशिक शहरातील पाणी पुरवठा बंद करण्याच्या निर्णयासंबंधित एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. नागरिकांनी योग्य वेळी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिक शहरातील रहिवांशासाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण महापालिकेने ठरवलेल्या पाणी बंद करण्याचा निर्णय सध्या रद्द करण्यात आलेला आहे. मात्र यामागील कारण काय असेल?
News18
News18
advertisement

निर्णय रद्द का केला?

नाशिक शहरात सध्या रस्त्यांची कामे आणि ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशातच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पाणी पुरवठ्याशी संबंधित महत्त्वाची कामे करण्यासाठी महापालिकेने 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. मात्र आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

advertisement

सिंहस्थ आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर कामे सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. द्वारका चौक भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने तो सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

21 आणि 22 फेब्रुवार रोजी होणार होती पाणी कपात 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर...
सर्व पहा

दरम्यान गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ती सुरु करण्यासाठी सध्या सुरु असलेली जलवाहिनीवर क्रॉस जोडणी करणे आवश्यक आहे. या कामांसाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News : पाणी येणार की जाणार? नाशिककरांच्या गोंधळावर महापालिकेचे स्पष्टीकरण; जाणून घ्या सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल