TRENDING:

Nashik: कुंभमेळ्याच्या आधी नाशिकच्या तपोवनमध्ये भयानक प्रकार, लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Last Updated:

 तपोवन येथील झाडांवर जादूचा प्रकार करण्यात आला आहे. या परिसरात वेगवेगळ्या झाडांवर  एका कुटुंबातील व्यक्तींचे फोटो आढळले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांवर जादुटोणा करण्याचे प्रकार घडले होते. पण, आता सिंहस्थ मेळावा होण्याआधी तपोवन परिसरात काळ्या जादूचा एक भंयकर प्रकार समोर आला आहे. इथं एका झाडावर एका कुटुंबातील व्यक्तीचे फोटो बिब्बे आणि बाहुली लावण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्यात येण्याच्या घटनेमुळे  तपोवन भूमी आंदोलनामुळे तापली होती. आता अशातच तपोवनमध्ये झाडांवर अंधश्रद्धेचे भयावह प्रकार केल्याचे समोर आला आहे.

अनेक झाडांवर खिळे आणि बिब्बे लावून फोटो लावल्याचा प्रकार उघड झाला आहे.

advertisement

तपोवन येथील झाडांवर जादूचा प्रकार करण्यात आला आहे. या परिसरात वेगवेगळ्या झाडांवर  एका कुटुंबातील व्यक्तींचे फोटो आढळले आहे. या फोटोंना बिब्बे आणि काळी बाहुली लावून खिळा ठोकला आहे. याआधीही नाशिकमध्ये अशा प्रकारचे प्रकार घडले होते. पण, तपोवनभूमीमध्ये असा प्रकार घडल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

हा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  जादू टोण्यासाठी खिळी ठोकल्याने झाडांना इजा पोहोचली जात आहे. हे असले प्रकार थांबले पाहिजे, अंधश्रद्धेच्या नावाखाली असले प्रकार केले जात आहे. इथं अनेक झाडांवर खिळे आणि जादूटोण्याच्या बाहुल्या आहे.  असा प्रकार हा अंधश्रद्धेतून घडला आहे. या प्रकारामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही, तपोवन येथील या प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, असं समितीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik: कुंभमेळ्याच्या आधी नाशिकच्या तपोवनमध्ये भयानक प्रकार, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल