TRENDING:

अशोक खरातकडे अनेक बड्या नेत्यांचं सिक्रेट, 24 तारखेला एन्काऊंटर होणार? खळबळजनक दावा

Last Updated:

Ashok Kharat Encounter News: नाशिकमधील लंपट ज्योतिष अशोक खरात याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या त्याचा दोन दिवसांत एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ashok Kharat Encounter News: नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिष आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचा दोन दिवसांत एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. नवी मुंबईच्या बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावं समोर आली होती. त्यामुळे प्रकरण दडपण्यासाठी हा एन्काऊंटर करण्यात आला. तशाच प्रकारे अशोक खरातकडे देखील अनेक नेत्यांची गुपितं आहेत. त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Ashok Kharat
Ashok Kharat
advertisement

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. खरातकडे अनेक बड्या नेत्यांची गुपितं असून ती बाहेर पडू नयेत यासाठी येत्या दोन दिवसांत त्याचा 'एन्काऊंटर' केला जाऊ शकतो, असा थेट दावा देसाई यांनी केला आहे. देसाई यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. तृप्ती देसाई यांनी एक व्हिडीओ जारी करत हा दावा केला.

advertisement

तृप्ती देसाईंनी नेमका दावा काय केला?

तृप्ती देसाई म्हणाल्या, "अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं. माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की, त्यांनी चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील हकालपट्टी करावी. अशोक खरातचे अनेक मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यामुळे अनेकांचं पितळ उघड होऊ शकतं. अनेक मंत्र्यांचे संबंध पुढे येऊ शकतात. म्हणून कदाचित अशोक खरातला संपवण्याचा डावही होऊ शकतो."

advertisement

"अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो"

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, "काल मला नाशिकमधून एका पीडित नातेवाईकाचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, २४ तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र २४ तारखेला खरातला कोर्टात घेऊन जाताना झटापटीत अशोख खरातला मारलं गेलं, अशा पद्धतीचा एन्काऊंटर होऊ शकतो, हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा डाव आहे."

advertisement

"एन्काऊंटरचा कट उधळून लावला पाहिजे"

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

"त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, अशोक खरातने बरेच कांड केले आहेत. अनेकांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यामुळे त्याला तातडीने संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवशी शिक्षा मिळाली पाहिजे, त्यामुळे अशाप्रकारे खरातला मारायचा डाव असेल, तर तो उधळून लावला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे," असंही तृप्ती देसाई बोलल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरातकडे अनेक बड्या नेत्यांचं सिक्रेट, 24 तारखेला एन्काऊंटर होणार? खळबळजनक दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल