नाशिक - शिक्षणानंतर कमी पगारात नोकरी परवडेना म्हणून एका तरुणाने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याला कुटुंबीयांनीही साथ दिली आणि आजा हा तरुण वर्षाला 3 ते 4 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. जाणून घेऊयात, नाशिकमधील तरुणाचा हा प्रेरणादायी प्रवास.
नाशिकच्या युवा उद्योजक भावेश दुगल याची ही कहाणी आहे. डिप्लोमा इंजीनिअरींगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने नाशिकच्या अंबळ एमआयडीसीमध्ये काही वर्ष नोकरी केली. मात्र, 12 तास काम आणि पगार फक्त 8 हजार असल्याने त्याला परवडत नसल्याने त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. घरी त्याने ही बाब सांगितल्यावर कुटुंबीयांनी चिंता वाटू लागली. मात्र, त्याने आपण व्यवसाय करणार असल्याचे सांगत विश्वास दिला. पण आई वडील बोलले की, शिक्षण चांगले झाले आहे. व्यवसाय कसा करतोस. त्यावर भावेश यांनी सांगितले की, माझा हाताखाली मीच काम करणार. मला वेळेचे बंधन नसणार. त्यामुळे मी माझी प्रगती लवकर करू शकेल. त्याच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी साथ दिली.
advertisement
भावेशला मोबाईल खरेदी-विक्रीची आवड असल्याने त्याने पुन्हा अनुभवासाठी 3 वर्ष एका नामांकित मोबाईल कंपनीमध्ये प्रमोटर म्हणून नोकरी केली. त्या ठिकाणी मोबाईल विक्रीचा अनुभव ग्राहकांसोबत कसे बोलावे, आपले कंपनीचे नाव कसे उंचवावे, अशा असंख्य गोष्टी त्याने तिथे 3 वर्षात शिकून 2018 पासून नाशिक फोन केअर या नावाने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला केलेल्या नोकरीतून साठवलेल्या पैशांनी दुकानात माल भरला. कुटुंबीयांनीही त्याला साथ दिली. तर काही प्रमाणात कर्ज काढून त्याने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.
धाराशिवमधील कुटुंबाची वर्षाला 90 लाखांची उलाढाल, व्यवसायाच्या बळावर कसं मिळवलं यश?
लोकल18 शी बोलताना तो म्हणाला की, सुरुवातीला दुकानात माल कमी प्रमाणात असायचा. मोबाईल कमी आणि मोबाईलचे खाली खोकेच दुकानात ग्राहकांना दिसायचे. मोजक्या कंपनीचे 2, 4 फोन यावेळी दुकानात विक्री व्हायचे. पण हळूहळू आमची सर्व्हिस लोकांना आवडू लागली. मोबाईलसोबत रिपेरिंगचे देखील त्यांनी काम सुरू केले. एका छोट्या अशा प्रवासापासून एकट्याने सुरू केलेले हे दुकान आज जवळपास 7 ते 8 जणांची टीम सांभाळत आहेत.
नवीन व्यवसाय होता. ओळख नवीन होती. त्यामुळे अडचणी खूप आल्या. मात्र, न खचता व्यवसाय सुरू ठेवला. आता त्याचे वार्षिक उत्पन्न हे 3 ते 4 कोटी रुपये असल्याचे त्याने सांगितले. त्याचे हे मोबाईलचे शोरूम नाशिक शहरातील ज्योतीप्रभा कॉम्प्लेक्स, SBI बँक समोर, दिंडोरी रोड, पोकार कॉलनी याठिकाणी आहे. सणासुदीच्या काळातही याठिकाणी ते ग्राहकांना सूट देतात. त्यामुळे त्यांच्या वस्तू या नाशिककरांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. तुम्हालाही याठिकाणी खरेदी करायची असेल तर तुम्हीही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.