धाराशिवमधील कुटुंबाची वर्षाला 90 लाखांची उलाढाल, व्यवसायाच्या बळावर कसं मिळवलं यश?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
dharashiv business success story - दरम्यान, काही काळ पुण्यात काम केल्यानंतर त्यांनी लहान भाऊ बालाजी कावळे यांना उद्योग व्यवसायात आणण्याचे ठरवले व 2015 च्या दिवाळीत सई स्टील अँड फर्निचर या नावाने आपला व्यवसाय सुरू केला.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव - एकत्र कुटुंबपद्धतीने व्यवसायाच्या बळावर कशा पद्धतीने यश मिळवता येते, हे एका कुटुंबाने सिद्ध करुन दाखवले आहे. शेतकरी असलेल्या कावळे कुटुंबाने स्टील आणि फर्निचरचा व्यवसाय केला आणि ते आता वर्षाकाठी 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. नेमकी त्यांची सुरुवात कशी झाली, ते या व्यवसायात यशस्वी कसे झाले, जाणून घेऊयात ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील कावळे कुटुंबातील शरद कावळे हे शेती परवडत नसल्याने पुण्यात एका खासगी कंपनीत काम करीत होते. दरम्यान, काही काळ पुण्यात काम केल्यानंतर त्यांनी लहान भाऊ बालाजी कावळे यांना उद्योग व्यवसायात आणण्याचे ठरवले व 2015 च्या दिवाळीत भूम येथे सई स्टील अँड फर्निचर या नावाने आपला व्यवसाय सुरू केला.
advertisement
व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी एका बँकेकडून कर्जही घेतले आणि यानंतर फक्त 6 महिन्यात व्यवसायाचे स्वरूप मोठे झाले. त्यामुळे शरद कावळे यांनी यांनी पुणे येथील नोकरी सोडली आणि तेही व्यवसाय वाढीसाठी काम करू लागले. गेली 9-10 वर्षात त्यांचा हा व्यवसाय नावारुपाला आला आहे. याठिकाणी ते भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तु, ताडपत्री, फर्निचर, आदी वस्तुंची विक्री करतात आणि या व्यवसायातून वर्षाकाठी 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
ॲड. शशिकांत कावळे, शरद कावळे व बालाजी कावळे, विशाल कावळे यांचे कुटुंब एकत्र आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची दृढ इच्छाशक्ती असल्यानंतर आपण व्यवसायात नक्कीच यशस्वी होतो, याची प्रेरणा मोठे बंधू शशिकांत कावळे यांच्याकडून त्यांना मिळाली. त्यांचा हा प्रवास इतरांसाठीही निश्चितच प्रेरणादायी आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 14, 2024 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवमधील कुटुंबाची वर्षाला 90 लाखांची उलाढाल, व्यवसायाच्या बळावर कसं मिळवलं यश?