ही धक्कादायक घटना, नवी मुंबईत घडली आहे. व्हिडिओमध्ये, एक तरुण हाय-स्पीड ऑटोमागे उभा आहे, ऑटोचा मागचा भाग धरून स्पायडरमॅन सारखा स्टंट करत आहे. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय तो अशापद्धतीनं उभा आहे. रिक्षा चालक देखील वेगानं गाडी चालवताना दिसत आहे. नियमांना धाब्यावर बसवून अशा पद्धतीने स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी युजर्स करत आहेत.
advertisement
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जीवाची पर्वा न करता अशापद्धतीनं धोकादायक स्टंट करणं आणि इतर प्रवाशांचा जीवही धोक्यात घालणं गुन्हा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकाची देखील चौकशी केली जात आहे. ही पहिली घटना नाही, अलिकडेच नवी मुंबईतून आणखी एक स्टंट प्रकरण समोर आले आहे.
अभिनेत्री नाझमीन सुलदे चालत्या मर्सिडीज-बेंझच्या बोनेटवर उभे राहून डान्स करताना दिसली. या स्टंटबाजीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे बाइकवरील कपलचा व्हिडीओ देखील तुफान चर्चेत आला आहे. बाइकवर बसून कपल अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ देखील चर्चेत आला होता.
