कालच्या परभणीतील मोर्चातृ हातात माईक घेऊन सुरेश धस 'अजितदादा क्या हुआ तेरा वादा' असे एकेरी भाषेत बोलले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारलाय.
तुमचा वाळू मोकाट सुटलाय त्याला आवर घालाल की नाही, महायुतीतील तिन्ही पक्षांनी नियम पाळले पाहिजे. प्राजक्ता माळी प्रकरणात माफी मागितल्यावर धस यांना समज दिली होती. मात्र पुन्हा त्यांनी परभणीतील मोर्चात अजितदादांवर बोलले ते राष्ट्रवादी सहन करणार नाही असा इशारा देत सुरेश धस यांना आवर घालण्याची विनंती अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे मिटकरी यांनी यावेळी सांगितले.
advertisement
सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते?
काही कारणास्तव माझ्या पक्षाकडून मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण मी अजितदादांना म्हटलं. पाच टर्म आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंके यांना मंत्री करा, राजेश विटेकर यांना मंत्री करा आणि दोन्हीही नाही जमले तर बुलडाण्यातून निवडून आलेल्या कायंदे यांना मंत्री करा. हवे तर आमचा जिल्हा मंत्रिपदाविना ठेवा. काही फरक पतड नाही. पण या आकाच्या आकाला (धनंजय मुंडे) यांना मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा…. असे सुरेश धस म्हणाले.
बीडमध्ये संदीप दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्या कुणी केल्या याच्या तपासाकरिता अजित पवार तुम्ही बारामतीहून माणसं पाठवावीत. बीड आणि परभणीला जिल्ह्यात बारामतीच्या माणसांनी येऊन येथील दहशतीची चौकशी करा. हजारो लोक गावं आणि शहरं सोडून गेली आहेत, हे तुम्हाला मान्य आहे काय? असा सवाल करून धनंजय मुंडे यांची दहशत सांगत सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरले.
