खरं तर दिल्लीत शरद पवार 6 जनपथ परिसरातील (Category Type VIII)बंगल्यात राहतात. येथे शरद पवार त्यांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहतात. आता त्यांच्याच समोरच्या बंगल्यात आता 11 जनपथ परिसरात (Category Type VII)अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राहणार आहेत.त्यामुळे आता दिल्लीत शरद पवार यांनी सुनेत्रा पवारे हे पक्के शेजारी बनणार आहेत. खरं तर नियमानुसार पहिल्या टर्ममध्ये खासदार बनणाऱ्या उमेदवाराला या परिसरात बंगला देण्यात येत नाही. मात्र अजित पवारांच्या दिल्लीतील ताकदीमुळे त्यांना हा बंगला देण्यात आला आहे.
advertisement
बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. या पराभवाने अजित पवारांना बारामतीत मोठा झटका बसला होता. त्यानंतर अजित पवारांनी राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे केले होते. येथे सुनेत्रा पवार निवडून राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे ज्या मराठवाड्याने महायुतीला पराभवाचा धसका दिला होता. त्याच मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी घवघवीत यश मिळवलं होतं.तसेच बालेकिल्ला असलेल्या बारामतीतही अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत जागा राखली होती. त्यामुळे या विजयानंतर अजित पवार एक मराठा नेतृत्व म्हणून समोर आले होते. तसेच महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रथम अजित पवारांनी त्यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळेच अजित पवार यांच्या याच विजयाने आणि भुमिकेमुळे पत्नी सुनेत्रा पवार यांना शरद पवारांच्या बंगल्या शेजारी बंगला मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
